पेठनामा : पक्ष वाढवण्यात शिवसेना, माकप, राष्ट्रवादीची आगेकूच

पेठनामा : पक्ष वाढवण्यात शिवसेना, माकप, राष्ट्रवादीची आगेकूच

पेठ | सुनील धोंडगे ( Peth )

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांचे ( Zilla Parishad, Panchayat Samiti Elections ) पडघम वाजू लागताच आपल्या पक्षास व निष्ठावंत पाठीराख्यास पदाधिकारी करुन राजकीय शक्ती वाढविण्यासाठी राष्ट्रवादी( NCP) , शिवसेना( Shivsena ) , माकप यांनी आघाडी घेतली आहे. त्या तुलनेने भाजप, काँग्रेस, मनसे यांच्या गटात अद्यापही सन्नाटा आहे.

जल जीवनच्या माध्यमातून केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवारांनी गावांसाठी पाणी टंचाई दूर होण्याचे आशावाद निर्माण करणारी योजनेची मुहुर्तमेढ कोपूर्ली गावातील या योजनेच्या निमित्ताने रोवली आहे. मुळात योजना आणून त्या वरील काम पूर्णत्वाचा कालावधी उलटूनही योजनाच कार्यान्वीत होत नाही. हीच शोकांतिका असतांना पुन्हा नविन कामांचा अट्टाहास व त्यावरील सर्व सामान्यांच्या विविध करांमधून राज्याच्या गंगाजळीत गेलेल्या निधी पुन्हा विकासाचे नावाने जनतेसाठी खर्च करतांना त्याचा किमान समस्या कायम स्वरूपी दूर होणे आवश्यक आहे.

स्थानिक संस्थाच्या निवडणूकीसाठी आपलाच वरचष्मा राहाणे साठी एकमेकांची विकास कामांचा निधी रोखण्यासाठीचा लेटर बॉम्बने धुमाकुळ घातला असून त्याची खरे किंवा खोटेपणा बद्दल कुणीही स्पष्टपणे बोलत नसल्याने हा ही राजकीय मुत्सद्देगिरीचा मुद्दा होऊ शकतो. राज्यात महाविकास आघाडीचे सरकारात भाजप वगळता इतर पक्ष एकसघतेने काम करीत असतांना गावपातळीवर मात्र पक्षांची हेवेगिरी पूर्वी प्रमाणेच कायम असल्याने तालुक्यातील 1 गट व 2 गणांची वाढ झाली असली तरीही त्या मध्ये आपणांस अनुकुल असणारी गावांचा समावेश गटात व गणात समावेश करण्यासाठी राजकीय शक्तीचा वापर करण्यात आल्याचे दिसून येते.

मात्र त्यावर आक्षेप न घेण्याचा दुबळेपणामुळे समजावा की अति आत्मविश्वास समजावा ही बाब निवडणूक निकाला नंतरच स्पष्ट होणार असली तरीही नंतरची आदळआपट निष्फळ ठरणारी असती हे सांगावयास नको ! सुरगाणा / पेठ मतदार संघ विभाजनानंतर काहीसा गलितगात्र झालेली माकपने निवडणुकीत समेटासाठीचा कडवा ताठरपणा सोडून किमान सत्तेत टिकून राहाणेसाठी सत्तेत असणे आवश्यक असल्याचे धोरण स्वीकारलेले असल्याने निवडणुकीतील जनतेचा, राजकीय शक्तींचा अदमास घेऊन युती, आघाडीची दाट शक्यता निर्माण झाली आहे. सोशल मिडीयाचे माध्यमातून काँग्रेसचे तालुकास्तरीय पदाधिकारी वेळोवेळी यंत्रणेकडे जनतेच्या समस्यांचे निराकरण करणेसाठी निवेदने देणे, विरोधकांना चिमटे घेणे, नागरिकांना त्यांचे हक्काची जाणीव करून देणे आदी कार्यक्रम राबवित असले तरीही निवडणूकीतील रणधुमाळीसाठीचे पोषक वातावरणासाठीची तयारी मात्र कुठेही दिसत नाही .

मनसेचे तालुकाध्यक्ष सुधाकर राऊत हे असेच अफलातून व्यक्तिमत्व निवडणुकीच्या रिंगणात विरोधकांच्या समोर कडवे आव्हान उभे करण्यात वाकबदार मात्र त्यांची राजकीय, आर्थिक कोंडी करूण त्यांना नमोहरम करण्यात येत असल्याने प्रत्यक्षात तिरंगी लढतीचेच चित्र जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकात दिसू शकते . मात्र मतदार संघातील राष्ट्रवादीचे बाहुबली आपल्या विकास कामांच्या मुद्यांवर , राजकीय शक्ती व कार्यकर्त्यांच्या बळावर सत्तांतर घडवण्याची उमेद बाळगुन असुन ही अपेक्षाही अनाठायी आहे असे भासत नसल्याने आगमी जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक अत्यंत चुरशीची व साम, दाम , दंड व भेदनितीची ठरणार यात मुळीच शंका नाही.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com