पेठ शहरासह तालुका करोनामुक्त

करोनामुक्त
करोनामुक्त

पेठ | Peth

पेठ शहरासह तालुका करोना मुक्त झाला असून नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.

पेठ शहर व तालुक्यात जवळपास ४ महिन्यां पासुन ठाण मांडून बसलेला, ३ व्यक्तींचा बळी घेणारा, शंभराच्या जवळपास नागरिकांना बाधित करणारा करोना अखेर शहरासह तालुक्यातून हद्दपार झाला आहे.

जनतेने शासनाने केलेले नियम पाळून आरोग्य विभाग व नियंत्रक यंत्रणेने केलेली उपाययोजनेमुळे आजमितीस करोनाची रुग्णसंख्या नामशेष झाली आहे.

मात्र तालुक्यातील जनतेने करोनामुक्तीने हुरळून न जाता नियमांचे पालन करून अद्यापही न टळलेला धोक्याचा मुकाबला करण्याचे आवाहन शासकीय यंत्रणेने केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com