<p>पेठ | Peth </p><p>पेठ तालुक्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या शुन्यावर आल्याने नाशिक जिल्ह्यात पेठ तालुक्याने पुन्हा एकदा करोनामुक्त होण्याचा मान मिळवला आहे. </p> .<p>पेठ तालुक्याची जवळपास 1 लाख 37 हजार लोकसंख्या असून , करोनाचे 98 रुग्ण आढळून आले. त्यापैकी 94 रुग्णांची यशस्वीपणे मात करुन घरवापसी केली तर अन्य आजाराने पीडित चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे.</p><p>उपविभागीय अधिकारी डॉ. संदीप आहेर यांच्या आधिपत्याखाली तहसीलदार संदिप भोसले, पोलिस निरीक्षक रामेश्वर गाडे, गटविकास अधिकारी नम्रता जगताप, वैद्यकिय अधिकारी डॉ. योगेश मोरे, मुख्याधिकारी लक्ष्मीकांत कहार यांनी प्रशासकीय यंत्रणेमार्फत नगरपंचायत तसेच ग्रामीण भागात योंग्य त्या प्रतिबंधात्कमक उपयोजना करुन करोना प्रसाराची साखळी खंडीत करण्यात यश मिळवल्याने सलग तीन वेळा तालुका करोनामुक्त झाला आहे.</p>