पेठ, सुरगाणा व त्र्यंबकमध्ये सर्वाधिक पाऊस; पाहा तालुकानिहाय पाऊस

पेठ, सुरगाणा व त्र्यंबकमध्ये सर्वाधिक पाऊस; पाहा तालुकानिहाय पाऊस
Heavy rain

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिक जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु आहे. धरणे भरण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे अनेक धरणातून विसर्ग (Water discharge from Dam) सुरु करण्यात आला आहे. गेल्या २४ तासांत सूरगाण्यात सर्वाधिक ३१६.१ मिलीमीटर पाऊस झाला. तर त्यापाठोपाठ त्र्यंबकेश्वरमध्ये ३०५.४ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे....(Trimbakeshwar Rain fall)

सुरगाणा (Surgana) तालुक्यातील उंबरठाण (umbarthan) येथे 64.2 मी.मी. पावसाची नोंद झाली. तर बा-हेत (Barhe) 64.5 मी.मी. पाऊस पडला. बोरगाव (Borgaon) येथे 57.0 मी.मीटर पावसाच्या सरी कोसळल्या. दुसरीकडे मनखेड (Mankhed) आणि सुरगाणा शहरात अनुक्रमे ६०.२ मिलीमीटर आणि ७०.०२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) तालुक्यातही ३०५.०४ पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये त्र्यंबक शहरात 74.00 मिलीमीटर, वेळूंजेत (Velunje) १२३ मिलीमीटर विक्रमी नोंद झाली. तर हरसूलमध्ये (Harsul)१०८.४ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.

दिंडोरी तालुक्यातही (Dindori Taluka Rainfall) पावसाची संततधार सुरु होती. येथील मोहडीत १० मिमी, उमराळेत ३३ मिमी, कोशिंबेत ५८ मिमी, ननाशीत १३८ मिमी, वरखेडयात ०६ मिमी, वणीत १४ मिमीत, दिंडोरीत ११ मिमी, तर लखमापूरमध्ये ०८ मिमी आणि रामशेजमध्ये २० मिमी पावसाची नोंद करण्यात आली.

पेठ शहरात 149.7 मिमी पावसाची नोंद झाली. (Peth Taluka rainfall) तर जोगमोडीत - 177.0 मिमी, काहोरमध्ये ९८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

तर सिन्नर शहरत ११ मिमी पावसाची नोंद झाली. (Sinnar taluka rainfall) पांढूर्लीत १० मिमी, नांदूरशिंगोटेत ५ मिमी, वावीत २ मिमी, शाहात २.७ मिमी, डुबेरेत १३.४ मिमी, देवपूरमध्ये ४.२ मिमी पावसाची नोंद झाली.

नाशिक शहरासह तालुक्यातही पावसाची संततधार सुरु आहे. (Nashik Taluka rainfall) यामध्ये शहरात १७ मिमी पावसाची नोंद झाली तर गिरणारेत ३५.०१ मिमी पावसाची नोंद झाली. पाथर्डी परिसरात ८ मिमी पावसाची नोंद झाली.

शिंदे येथे ७.६ मिमी पावसाची नोंद झाली. सातपूर (Satpur)१४.२० मिमी, देवळाली परिसरात (Deolali Area) १४.०२ मिमी, माढसांगवीत ९.०१ मिमी पावसाची नोंद झाली. मखमलाबादमध्ये १७ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

कळवण तालुक्यात १२२ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. (Rainfall in Kalwan area) यामध्ये शहरात १० मिलीमीटर, नवीबेजमध्ये ११ मिमी, दळवट ३९ मिमी, कनाशीत २९ मिमी, मोकभनगीत, २ मिमी, अभोण्यात ३१ मिमी पावसाची नोंद झाली.

इगतपुरीत १५३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. (Rainfall in Igatpuri) घोटीत १०३.६० मिलीमीटर पावसाची नोंद झाली तर वाडीवर्हेत २७.४० मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. नांदगावात २८ मिमी पाऊस झाला तर टाकेदमध्ये २९ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. तर धारगाव परिसरात ७५ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com