पेठ ग्रामीण रुग्णालय की अस्वच्छतेचे आगार?

पेठ ग्रामीण रुग्णालय की अस्वच्छतेचे आगार?
USER

पेठ । वार्ताहर

पेठ ग्रामीण रुग्णालयाचा पुढील भाग कोविड उपचारासाठी आरक्षित करून तेथे 28 ऑक्सिजन बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. पुढील भागात करोना उपचार केंद्र सुरू करताच इतर उपचारांसाठी येणार्‍या रुग्णांचे प्रमाण नगण्य झाले आहे. त्यातच गेल्या महिनाभरापासून निवासी वैद्यकीय अधिकारी नाही.

नव्याने रुजू झालेल्या हंगामी डॉक्टरांवर सेवा अवलंबून असताना कोविड विभाग जवळपास नर्सेसच्या भरोशावरच सुरू आहे. कोविड वॉर्डसाठी स्वच्छतेचा ठेका देण्यात आला आहे. मात्र त्याचे अस्तित्व कुठेही दिसून येते नाही.

कोविड वॉर्डातील स्वच्छतागृहाची अवस्था अत्यंत भयावह असून घाणीने ओथंबून वाहणारी भांडी तसेच बेसिनचा पाईप निघून पडला आहे. त्यामुळे स्वच्छतागृहाच्या दरवाजाजवळच पाण्याचे डबके, प्रवेशद्वाराजवळच वापरलेले कचर्‍याचे गाठोडे व आवारात साचलेला कचरा, पाण्याच्या बाटल्यांचे ढीग आजारास आमंत्रण देत आहेत.

कोविड वॉर्डात रोजंदारीवर नेमलेले दोन सफाई कामगार सफाईचे काम करत असताना सफाईचे टेंडर दिलेल्या ठेकेदाराचे कामाचे स्वरूप काय? असा प्रश्न उपस्थित होत असताना ग्रामीण रुग्णालयाच्या कोपर्‍यात फिनाईल अक्षरशः वाहत असताना आरोग्य व्यवस्थेचे ओंगळवाणे स्वरूप बदलणे ही काळाची गरज आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com