पेठ | प्रतिनिधी

पेठ शहरापासुन ४ किमी अंतरावर असलेल्या वांगणी गावाजवळ जिल्हा वाहतुक शाखेच्या हवालदारावर ट्रक घातल्याने या पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली...

अधिक माहिती अशी की, पेठकडून वापीकडे राजू रोडलाइन्स ट्रान्सपोर्ट कंपनीचा ट्रक क्र. एम एच २३ , एयू १४४१ भरधाव वेगात येत होता. जिल्हा वाहतुक शाखेच्या वाहनाजवळ उभ्या असलेल्या पोलीस नाईक कुमार गायकवाड यांना आज दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारासधडक दिली.

कुमार गायकवाड यांना जबर दुखापत झाल्यामुळे त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. यावेळी जिल्हा वाहतुक शाखेच्या एम एच १५, एफ टी २४१९ या वाहनात चालकासह ६ कर्मचारी होते.

वाहतुक सुरक्षा सप्ताहानिमित्त वाहने अडवुन तपासणी करण्यात येत असल्याने भरधाव वाहनास अडवण्याच्या प्रयत्नात अपघात घडल्याचे प्राथमिक वृत्त आहे.

या दुर्दैवी घटनेनंतर वरिष्ठ यंत्रणेतील अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली. याप्रकरणी गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु आहे.