वाहतूक कोंडीच्या समस्येने पेठ शहरवासीय हैराण

News Update | न्यूज अपडेट
News Update | न्यूज अपडेटNews Update | न्यूज अपडेट

पेठ | प्रतिनिधी | Peth

कोटंबी घाटातील (Kotambi Ghat) अपघातांच्या (Accident) सततच्या प्रकाराने वाहनधारक त्रस्त असतांनाच आता पेठ शहराजवळील हट्टीपाडा नजिक होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या (Traffic Jam) समस्येने शहरवासीय हैराण झाले आहेत...

याबाबत अधिक माहिती अशी की, हट्टीपाडा परिसरात (Hattipada Area)रस्त्याचे काम सुरु असून एकेरी वाहतूक होत असल्याने वाहनाच्या दुतर्फा रांगा लागत आहेत. त्यामुळे पेठ शहरातील दुकानांसमोर (Shops) तासनतास वाहने उभी राहात असल्याने व्यवसाय करणे अशक्य होत आहे.

तसेच जिल्हा महामार्ग पोलीस (Police) वाहनचालकांना तपासणीसाठी रस्त्यात अडवत असल्याने वाहतूक कोंडी असून याकडे पोलीस हेतुपुरस्सर दुर्लक्ष करत असल्याचे येथील व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com