पेठचे गण आरक्षण जाहीर: 'या' जागांवर महिलाराज

पेठचे गण आरक्षण जाहीर: 'या' जागांवर  महिलाराज

पेठ | Peth

तालुक्यातील पंचायत समितीच्या आगामी निवडणूकीसाठीच्या (Panchayat Samiti Election) गण आरक्षणाची राज्य निवडणूक आयोगाच्या (State Election Commission) सुचनेप्रमाणे आरक्षण सोडत (Reservation Draw) जाहीर करण्यात आली...

तहसील कार्यालयात उपजिल्हाधिकारी गणेश मिसाळ (Ganesh Misal) यांच्या उपस्थितीत तहसीलदार संदीप भोसले (Sandip Bhosale) यांनी सोडत कार्यक्रम घोषित केला.

यावेळी २ गट व ४ गण ऐवजी एका गटाची (Gat) वाढ होऊन ३ गट व ६ गण (Gan) निर्माण झाले. गत पंचवार्षिक कालावधीत अनुसूचित जमातीसाठी स्त्री राखीव असलेले करंजाळी, कोहोर गणातून स्त्री राखीव असलेले गण वगळण्यात आले आहे.

पेठचे गण आरक्षण जाहीर: 'या' जागांवर  महिलाराज
आदेशापूर्वीच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवायच होणार

यंदाच्या सोडतीत आंबे, सुरगाणे (उं) , कुंभाळे हे गण अनुसूचित जमाती महिला राखीव झाले आहे. आरक्षण सोडतीला तालुक्यातील सर्व पक्षांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com