वैयक्तिक जबाबदारी आवश्यक : राजपूत

वैयक्तिक जबाबदारी आवश्यक : राजपूत

खेडगाव । वार्ताहर Khedgaon

‘विद्यार्थ्यांनी (students) शैक्षणिक विकास (Educational development) करण्याबरोबरच सामाजिक आरोग्य (health) व स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे’, असे प्रतिपादन वणी पोलीस ठाण्याचे (Vani Police Station) सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल राजपूत (Assistant Inspector of Police Swapnil Rajput) यांनी केले.

शिंदवड (shindvad) येथे खेडगाव (khedgaon) महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या (Department of National Service Planning) विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या समारोप कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. राजपूत पुढे म्हणाले की, युवकांनी समाज सेवेबरोबरच शासकीय नियमांचे तंतोतंत पालन करून खर्‍या अर्थाने राष्ट्रीय विकासात हातभार लावण्याचे त्यांनी आवाहन केले. जिल्हा परिषद सदस्य भास्कर भगरे यांनी श्रमसंस्कार शिबिरातून नियोजित वेळेत अपेक्षित कामे पूर्ण केल्याबद्दल गौरवोद्गार काढले.

मविप्र संस्थेचे संचालक दत्तात्रय पाटील (Director of MVP Dattatraya Patil) यांनी श्रमसंस्कार शिबिरातून विद्यार्थ्यांमध्ये समाजसेवेचे गुण येऊन त्यातूनच सामाजिक बांधिलकी, समूह कार्य व सहकार्याची भावना अशा गुणांचा विकास होत असल्याचे सांगितले. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. एस. टी. वाघ यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. डी. एन. कारे यांनी शिबिर काळात केलेल्या उल्लेखनीय कार्यांचा आढावा सादर केला.

त्याचबरोबर शिवाजी नाठे, सचिन बस्ते या मान्यवरांसह अर्चना तिडके, प्रदीप बागुल, अंकिता शिरसाठ, मयूर पुरकर, तन्वी रणदिवे या विद्यार्थ्यांनी शिबिर काळात आलेला स्वानुभव सादर केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी विकास शिंदे यांनी तर आभार प्रदर्शन योगिता गरुड यांनी केले.

याप्रसंगी सरपंच लताबाई बस्ते, उपसरपंच शकुंतला मोरे, अमोल बरकले, शिवाजी बस्ते, चेअरमन रामनाथ बस्ते, सुदाम गाडे, सुनील गाडे, बाळासाहेब बस्ते, सोपान बस्ते, अनिल ठुबे, मुकुंद गांगुर्डे, कृष्णा गांगुर्डे आदी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com