स्वप्नपूर्तीसाठी हवी जिद्द!

देशदूत युथ आयकॉन - आकाश कापडणे, संचालक, ओम कन्स्ट्रक्शन.
स्वप्नपूर्तीसाठी हवी जिद्द!

नाशिक । प्रतिनिधी

‘ओम बिल्डर्स अँड डेव्हलपर्स’ हा नाशिकमध्ये रियल इस्टेट उद्योगातील एक आघाडीचा ब्रँड आहे. प्रत्येकालाच वाटत असते आपले घर गुणवत्तापूर्ण व आपल्या खिशाला परवडेल असे हवे. आपल्या स्वप्नातील घर घेण्यास प्रत्येकजण आतूर असतो. स्वप्नांची पूर्तता करण्यात ओम बिल्डर्स सध्या आघाडीवर आहे. गुणवत्ता, उपयुक्त तपशील आणि पैशाचे मूल्य याची खात्री यावर लक्ष केंद्रित करून ते प्रत्येक घर कष्टपूर्वक बनवतात. ‘ओम कन्स्ट्रक्शन’चे संचालक आकाश कापडणे व संजय दप्तरे यशस्वीरीत्या व्यवसाय सांभाळत आहेत.

आकाश यांचा आजपर्यंतचा प्रवास तितकाच संघर्षमय आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण मुंबईमध्ये झाले. आई-वडील व ते स्वतः असा छोटासा परिवार होता. त्यांच्यावर आईची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली. त्यांनी मुंबई सोडून नाशिकला स्थलांतर केले. पुढील शिक्षण नाशिकला सुरू करून ते पूर्ण कराना बांधकाम व रिअल इस्टेट क्षेत्रात इतर व्यावसायिकांकडे त्यांनी काम केले व त्यानंतर 2009 ला स्वतः पार्टनरशिपमध्ये प्रत्यक्ष व्यवसाय सुरू केला यात त्यांना दप्तरे यांची मदत मिळाली.

इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण करताना त्यांनी पहिली साईट इंदिरानगर येथे सुरू करून यशस्वीरीत्या पूर्ण केली. साईट छोटीशी होती. मात्र त्यातून मिळालेला त्यांचा आत्मविश्वास मात्र खूप मोठा होता. दरम्यानच्या काळात अनेक गोष्टी त्यांना शिकायला मिळाल्या आत्मविश्वास प्रचंड मेहनत व आपल्या बौद्धिक क्षमतेच्या जोरावर आज ग्राहकांना ते उत्तम सेवा देत आहेत.

व्यवसायाला यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञानाची जोड दिली. गुणवत्तेवर ओम बिल्डर्स यांचा भर असतो. बांधकाम व्यवसायात काळानुरूप बदल होतात, हे बदल त्यांनी आत्मसात करून ग्राहकांना अपेक्षित, किंबहुना अधिक चांगली सेवा देण्याचा प्रयत्न ते करतात. त्यामुळेच त्यांच्या व्यवसायाला अधिकाधिक वृद्धी मिळाली आहे.

ओम बिल्डरच्या गुणवत्तेमुळे नाशिकच्या कानाकोपर्‍यात त्यांच्या विविध साईट्स चालू आहेत. मध्यवर्ती ठिकाणांपासून पाथर्डी फाटा, जत्रा हॉटेल, आडगाव परिसर आदी ठिकाणी चांगली कामे पूर्ण करून त्यांनी लौकिक मिळवला आहे. आकाश कापडणे यांचे कर्तृत्व अनेकांना प्रेरणादायी आहे.

यश प्रत्येक पावलावर जवळ येते. मात्र अखंड चालण्याची तयारी ठेवा. स्वप्ने मोठी असतील तर पाया मजबूत करा. तेव्हाच समतोल राहील. आयुष्यातील स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न आणि परकष्टेसोबत हवी जिद्द!

- आकाश कापडणे, संचालक, ओम कन्स्ट्रक्शन.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com