
निफाड । प्रतिनिधी | Niphad
जीवनामध्ये यशस्वी (Success) व्हायचे असेल तर मेहनती शिवाय दुसरा पर्याय नाही. जिद्द, चिकाटी व मेहनत (Perseverance, perseverance and hard work) यांची योग्य सांगड घातली तर माणूस हा कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होतोच असे प्रतिपादन लेफ्टनंट ओम गांगुर्डे (Lieutenant Om Gangurde) यांनी केले आहे.
येथील कर्मवीर गणपत दादा मोरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात माजी विद्यार्थी (students) संघाच्या वतीने लेफ्टनंट ओम गांगुर्डे व डॉ.नितीन गांगुर्डे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा (Competitive examination) व आर्मीतील करिअरच्या संधी (Career opportunities in the Army) या विषयावर लेफ्टनंट ओम गांगुर्डे यांनी मार्गदर्शन केले. 10 वी व 12 वी नंतर आर्मी (army) या क्षेत्रामध्ये कोणत्या परीक्षा असतात. त्यासाठी विद्यार्थ्याने कसे परिश्रम करावेत. कोणते विद्यार्थी पात्र होतात, निवड चाचणी कशी होते याविषयी सखोल मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे दिली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.एन. भवरे म्हणाले की, वेळेचे योग्य नियोजन व अभ्यासातील सातत्य आणि शिस्त या त्रिसूत्रींचा विद्यार्थी दशेत अवलंब केला तर विद्यार्थी (students) हा उत्तम रीतीने घडतो व पुढील आयुष्यात त्याला कमी कष्ट घ्यावे लागतात. त्यासाठी विद्यार्थी जीवनामध्ये त्याने योग्य मेहनत केली पाहिजे. परिश्रम हा विद्यार्थ्यांचा दागिना आहे असे प्रतिपादन केले. तर अध्यक्षीय मनोगतात माधव गीते म्हणाले की, त्या त्या क्षेत्रातील अनुभवी व्यक्तीचे विचार विद्यार्थ्याचे व्यक्तिमत्त्व प्रगल्भ होण्यास मदत करीत असतात.
विद्यार्थी जीवन हे पंखात बळ भरण्याचे दिवस असतात. महाविद्यालयातील प्रत्येक दिवस, प्रत्येक अनुभव आपल्याला काहीतरी शिकवून जात असतो. या वयात विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त कष्ट घेऊन आपले व्यक्तिमत्त्व समृद्ध केले पाहिजे असे प्रतिपादन केले. यावेळी पांडुरंग शिंदे यांनीही मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी उत्तम आवारे, डॉ.काका गांगुर्डे, विलास मत्सागर, वैकुंठ पाटील, दीपक श्रीवास्तव, दिलीप कापसे, श्रीमती. पल्लवी खापरे, उपप्राचार्य एल. गायकवाड, डॉ.एम.बी. वाघ, प्रा.अभय वडघुले,
प्रा.सुनीता उफाडे, प्रा.मोनिका कारे, प्रा.एस.डी. आहेर, प्रा.एस.बी. गायकवाड, प्रा.मनीषा कोटकर, प्रा.कापसे, प्रा.थोरात, सचिन शिंदे, एनसीसी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा.प्रतिभा पाटील यांनी केले तर डॉ.पी.पी. परमार यांनी आभार मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीत गायनाने झाली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ग.दा. मोरे महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापकेतर सेवक व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.