करोना प्रतिबंध खर्चासाठी ग्रामपंचायतींना परवानगी

करोना प्रतिबंध खर्चासाठी ग्रामपंचायतींना परवानगी

नाशिक । प्रतिनिधी

पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून साथरोग प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी ग्रामपंचायतींना वेगळ्या आदेशाची गरज नाही. शासन निर्णयात तसे स्पष्टपणे नमूद आहे.

त्यामुळे ग्रामपंचायतींनी खर्च करण्यास परवानगी घेण्याची गरज नाही, अशा शब्दात मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी प्रशासनाची भूमिका मांडली.यामुळे ग्रामपंचायतींना पंधराव्या वित्त आयोगाचा निधी कोविडसाठी खर्च करता येणार आहे.

स्थायी समितीची ऑनलाईन बैठक अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी भाजप गटनेते डॉ. आत्माराम कुंभार्डे यांनी गावोगावी उभारल्या जात असलेल्या विलगीकरण कक्षांसाठी ग्रामपंचायतींकडून खर्च केला जात नाही. पंधराव्या वित्त आयोगातून साथरोग प्रतिबंधक उपाययोजनांसाठी खर्च करण्यास परवानगी असूनही जिल्हा परिषदेकडून परवानगी नसल्याचे ग्रामसेवकांकडून सांगितले जाते, असे सांगितले.

यावर मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी शासन निर्णयात तो निधी कशासाठी खर्च करावा, हे स्पष्ट असल्याने जिल्हा परिषदेच्या वेगळ्या पत्राची गरज नाही. सर्व ग्रामसेवक व सरपंचांशी संवाद साधताना मी ग्रामपंचायतींनी काय करावे, याचे निर्देश दिले आहेत. ग्रामपंचायतींनी निधी खर्च करण्यासाठी वेगळे पत्र देण्याची गरज नाही. काही ठिकाणी हा मुद्दा असेल, तर तेथील ग्रामसेवकांना मी सूचना देईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com