पंचवटी। वार्ताहर Nashik

सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक आदी गर्दीच्या सर्वच कार्यक्रमास तसेच विवाह सोहळ्यासही आता पोलिसांची परवानगी घेणे सक्तीचे होणार असल्याचे असे प्रतिपादन पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी केले. शनिवारी (दि. 5) रोजी आडगाव पोलीस ठाण्यात शांतता समिती सदस्य, पोलीस मित्र व पोलीस पाटील यांच्या बैठकीत ते बोलत होते.

बैठकीस पोलीस उपायुक्त अमोल तांबे, संग्रामसिंग निशानदार, प्रदीप जाधव, वाहतूक शाखेचे सीताराम गायकवाड, नगरसेवक उद्धव निमसे, सुरेश खेताडे, अजिंक्य वाघ, शशिकांत राऊत, पोलीस पाटील गजाजन भोर, प्रकाश माळोदे, प्रकाश केकाने आदी उपस्थित होते. यावेळी उत्कृष्ट कार्य करणार्या अधिकारी, सेवक आणि मविप्रच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीन यांचा सत्कार करण्यात आला.

उद्धव निमसे यांनी या चौकात व्यवसायिक गाड्या चौकात लावतात, त्यामुळे अडथळा निर्माण होतो, हे अतिक्रमण काढण्यास पोलिसांच्या सहकार्याची गरज असल्याचे सांगितले. सुरेश खेताडे यांनी मिर्ची हॉटेल चौक सिग्नल, शिवनगर चौकात अपघात होतात यावर उपाययोजना करण्याची मागणी केली. शशिकांत राऊत यांनी पोलिसिंग सर्वसामान्य नागरिक नाकाबंदीत सामान्य नागरिकांना त्रास व्हायचा, पोलिसांचा त्रास कमी झाल्याचे सांगितले.

औरंगाबादवरील माडसांगवी, ओढा, शिलापूर, लाखलगाव, विडी कामगार नगर, तपोवन आदी ठिकाणी गतिरोधक बसविण्यात येण्याची मागणी उपस्थितांनी केली. विशाल जेजुरकर यांनी निलगिरी बाग येथे भाजीबाजार रस्त्यावर बसतात. त्यांच्यावर आळा घालावा. शेतकर्यांची व्यापार्यांकडून फसवणूक होत आहे, त्यांना न्याय मिळावा. तपोवन जॉगिंग ट्रॅक व्यसनी लोक बसून असतात, त्यांच्यावर आळा बसवा, अशा मागण्या करण्यात आल्या. आभार वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेख यांनी मानले.