...अखेर ‘त्या’ स्टॉल्सना परवानगी

...अखेर ‘त्या’ स्टॉल्सना परवानगी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

गंगापूर नाका (Gangapur Naka) भागातील डोंगरे वसतिगृहावर (Dongre Vastigruh) दरवर्षी गणेशोत्सवापूर्वी (Ganeshotsav) विक्रेते मूर्ती विक्रीसाठी स्टॉल्स उभे करतात. यंदाही जवळपास शंभर स्टॉल्स उभे राहिले....

मात्र, या स्टॉल्सला परवानगीच नसल्याचे पुढे आले. त्यामुळे सरकारवाडा पोलिसांनी (Sarkarwada Police) मैदानाचे दोन्ही गेट बंद करीत विक्रीवर बंधने घातली होती.

यामुळे विक्रेत्यांची चांगलीच पंचाईत झाली. याबाबत पालकमंत्री छगन भुजबळ (Guardian Minister Chhagan Bhujbal) यांनीही दखल घेतली. विक्रेत्यांचे आर्थिक नुकसान होणार हे बरोबर असले तरी त्यांनी महापालिका आणि पोलिस विभागाची परवानगी घेणे तितकेच महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट केले.

गणेशमूर्ती विक्रेत्यांचे होणारे नुकसान आणि नियमांचे पालन करण्याची हमी याआधारे पोलीस आयुक्त दीपक पांडे (Police Commissioner Deepak Pandey) यांनी अखेर गंगापूर नाका येथील डोंगरे वसतिगृह मैदानावर (Dongre Vastigruh Ground) गणेशमूर्ती विक्रीच्या स्टॉल्सला परवानगी दिली आहे. यामुळे येथील व्यावसायिकांचा गणेशमूर्ती विक्री करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com