अपंगांच्या सेवेसाठी कायमस्वरूपी केंद्र

अपंगांच्या सेवेसाठी कायमस्वरूपी केंद्र

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नव्या पिढीतील युवा कार्यकर्त्यांचे सेवा कार्य उत्तम आहे. अपंगांच्या (Disables )सेवेसाठी महावीर धर्मार्थ दवाखान्यात (Mahavir Charitable Hospital )कायमस्वरूपी विनामूल्य केंद्र सुरू करण्यात आले असून, त्याचे लोकार्पण 75 अपंगांना कृत्रिम अवयव (Prostheses ) वाटपातून करण्यात आल्याबद्दल कार्यक्रमाचे अध्यक्ष जे. सी. भंडारी यांनी समाधान व्यक्त केले.

नवकार आशिष सेवा ट्रस्ट (Navkar Ashish Seva Trust )व श्री महावीर धर्मार्थ दवाखाना संचलित आरएमडी हॉस्पिटलमध्ये 75 गरजू विकलांग व्यक्तींना जयपूर फूट वितरित करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर साध्वी प्रीतीसुधाजी, ग्यानप्रभाजी यांच्या शिष्या पुष्पचुलाजी तसेच आभाजी व विभाजी उपस्थित होत्या. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून ब्रिजलाल कटारिया, नरेंद्र बाफना, प्रकाश गांधी व बालचंद मुग्धिया उपस्थित होते. या प्रकल्पासाठी पुण्याच्या साधू वासवानी ट्रस्टने सहकार्य केले होते.

नवकार आशिष सेवा ट्रस्टतर्फे गेल्या चार वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबवले जातात. गरीब, होतकरु विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व पुस्तके देण्यात येतात. रक्तदान शिबिरे व रुग्णांवर विनामूल्य उपचार करण्यात येतात. संस्थेला 80 जी अंतर्गत देणग्या द्याव्यात, असे आवाहन आयोजकांनी केले.

कार्यक्रमात उपस्थितांना प्रीतीसुधा म. सा., नियमदर्शना म. सा. आणि आभाजी म. सा. यांचे प्रबोधन केले. विश्वस्त संदीप गांग यांनी प्रास्ताविक केले. डॉ. अश्विनी कांकरिया यांनी स्वागतगीत सादर केले. सुरुवातीला आनंदचालिसा पठण झाले. उपस्थित गरजू विकलांग लाभार्थीना जयपूर फूट प्रदान करण्यात आले. यावेळी स्वतःच्या पायावर उभे राहिल्याचा त्यांचा आनंद कार्यकर्त्यांचे बळ वाढविणारा होता.

कार्यक्रमाला पारस साखला, शशिकांत सुराणा, नंदलाल पारख, शंकरलाल गांग, कांतीलाल कोठारी, सुभाष लुणावत, पोपटलाल नहार, उमेश भंडारी, रवी लुणावत, साधू वासवानी ट्रस्टचे डॉ. साहिल जैन, जाधव, धनराज संचेती उपस्थित होते. लता लोढा यांनी भोजन प्रसादासाठी सहकार्य केले. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी मारवाडी युवा मंच, समकित ग्रुप, महावीर सेवा फाउंडेशन, उमीद फाऊंडेशन तसेच नवकार ग्रुपच्या युवा कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

या कार्यक्रमाला आचार्य आनंदऋषीजी महाराजांचा 30 वा स्मृतिदिन, उत्तर भारतीय प्रवर्तक राष्ट्रसंत आशिषमुनींचा 70 वा जन्मदिन व आभाजी-विभाजी यांचा 18 वा दीक्षादिन असा दुग्धशर्करायोग जुळून आला होता.

Related Stories

No stories found.