मौखिक आजारासाठी वेळोवेळी तपासणी आवश्यक

मौखिक आजारासाठी वेळोवेळी तपासणी आवश्यक

नाशिक | प्रतिनिधी Nashik

मौखिक कर्करोगाचे आजार (Oral cancer) हे तोंडातील अल्सर (Ulcers) पासून सुरु होतात. तसेच तंबाखू (Tobacco), सिगारेट (Cigarettes) आदी अंमली पदार्थाचे (Drugs) अतीप्रमाणात व्यसन केल्याने मौखिक कर्करोग होत असतो. यासाठी वेळोवेळी आपले मुख स्वच्छ करणे, त्यासाठी दंतचिकित्सक (Dentist) यांचेकडून आपल्या दातांची तसेच मौखिक आजारांची वेळोवेळी तपासणी करणे आवश्यक आहे.

खाण्याबाबत सध्याचे वाढते पाश्चिमात्य भोजन (Western food), खाण्यापिण्याच्या बदललेल्या सवयी, मैदायुक्त (Flour), तंतुमय पदार्थांचे सेवन (Fiber intake) झाल्याने त्याचे कन दातात चिकटून राहिल्याने दात किडण्याची शक्यता अधिक असते. सध्या दात खराब होण्यामध्ये लहान मुलांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. चॉकलेटचे जास्त प्रमाणात सेवन, मेदयुक्त पदार्थांचे सेवन जास्त झाल्याने देखील दातांचे आजार मोठ्या प्रमाणावर होत असतात.

दात दुखायला लागल्यावर दवाखान्यात जाण्यापेक्षा वर्षातून एकदा तरी दातांची साफ सफाई होणे आवश्यक आहे. व्यसनाधीनतेकडे झुकलेल्या तरुणाईला मौखिक तपासणी अत्यंत आवश्यक आहे. या कर्करोगासारख्या महारोगापासून वाचायचे असेल तर वेळीच कर्करोगाचे निदान होणे आवश्यक आहे. तसेच त्यावर त्वरित उपचारपद्धती राबविण्यासाठी त्यासाठी मौखिक तपासणी आवश्यक आहे.

आपण दर सहा महिन्यातून जसे आपल्या वाहनांची देखभाल करत असतो; त्याचप्रमाणे आपल्या दातांची निगा (Dental care) राखण्यासाठी वर्षभरातून एकदा देखभाल करणे गरजेचे आहे. दात दुखत आहे म्हणून उपचार करण्यापेक्षा वेळीच देखभाल करून दुखण्यापासून आपण परावृत्त होऊ शकतो. यासाठी समाजात जणजागृती होणे आवश्यक आहे.

- डॉ. कुणाल शहा दंतशल्य चिकित्सक

Related Stories

No stories found.