दिव्यांगांनी योजनांचा लाभ घ्यावा

हातमाग वाटप कार्यक्रमात अप्पर जिल्हाधिकारी पाटोळे यांचे आवाहन
दिव्यांगांनी योजनांचा लाभ घ्यावा

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

दिव्यांगांशी (handicapped) सहानभुतीने नव्हे तर त्यांच्यात आत्मविश्वास (Confidence) निर्माण होईल असेच सहकार्य करत त्यांना विकासाच्या प्रक्रियेत सहभागी करून घेण्याची गरज आहे.

दिव्यांग संस्थेतर्फे शहरातील दिव्यांग बंधू-भगिणींच्या विकासासाठी केले जात असलेले प्रयत्न कौतुकास्पद आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ (Benefits of schemes) दिव्यांगांना मिळावा तसेच त्यांच्या समस्यांचे निराकरण (Problem solving) व्हावे या दृष्टीकोनातून आपण प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही अप्पर जिल्हाधिकारी माया पाटोळे (Collector Maya Patole) यांनी येथे बोलतांना दिली.

येथील किदवाईरोडवरील प्राथमिक शाळा प्रांगणात मुंबई (mumbai) येथील लिला म्हात्रे प्रतिष्ठान (Lila Mhatre Pratishthan) तसेच मालेगाव दिव्यांग एज्युकेशन सोसायटी (Malegaon handicapped Education Society) यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील दिव्यांग बांधवांना कुबड्यांचे तसेच रोजगारासाठी हातमागचे वाटप (Distribution of handlooms) करण्यात आले.

या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करतांना अप्पर जिल्हाधिकारी पाटोळे बोलत होत्या. म्हात्रे प्रतिष्ठानचे चेअरमन एन.डी. म्हात्रे, रमेश कुलकर्णी, अ‍ॅड. मोमीन मुसद्दीक, अ‍ॅड. मोमीन मुजीब, उद्योगपती जिया हकीम, रविश मारू, इम्तियाज जलील, जमील क्रांती, संस्था अध्यक्ष मुदस्सीर रजा आदी मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते.

दिव्यांग बांधवांचे हक्क व समस्यांचे निराकरण व्हावे यासाठी संस्थेतर्फे राबविले जात असलेले उपक्रम प्रशंसनीय असल्याचे स्पष्ट करीत पाटोळे यांनी शासनाच्या दिव्यांगांच्या उत्कर्षासाठी विविध योजना आहेत. या योजनांचा लाभ दिव्यांगांनी घेतला पाहिजे यासाठी आपण सर्व सहकार्य शहरातील दिव्यांग बांधवांना करू, अशी ग्वाही शेवटी बोलतांना दिली. रोजगार प्राप्तीसाठी शहरातील दिव्यांगांचा होत असलेल्या संघर्षाची माहिती मिळाल्याने त्यांना स्वयंपुर्ण बनविण्याच्या दृष्टीकोनातून प्रतिष्ठानतर्फे हातमागची निर्मिती करण्यात येवून त्याचे वाटप आज येथे केले जात आहे.

दिव्यांग व्यक्ती हे हातमाग चालवू शकतो त्याला वीज लागत नाही. तसेच गरजेनुसार या हातमागाचे खुर्चीमध्ये देखील रूपांतर करू शकतो. या हातमागाव्दारे साडीसह रूमाल, चादर आदी कापडांची निर्मिती होवू शकणार असल्याने हे हातमाग दिव्यांगांना रोजगार मिळवून देणारे ठरेल, अशी माहिती म्हात्रे प्रतिष्ठानचे प्रमुख एन.डी. म्हात्रे यांनी यावेळी बोलतांना दिली. यावेळी उच्च न्यायालयाचे अ‍ॅड. मोमीन मुसद्दीक (High Court Adv. Momin Musaddiq) यांनी मिशन स्वयंपुर्ण योजनेबाबत (Mission autocomplete plan) माहिती दिली. उद्योजक रविश मारू, जमील क्रांती यांनी यावेळी मार्गदर्शन केले.

दिव्यांग सोसायटीचे अध्यक्ष मुदस्सीर रजा यांनी प्रास्ताविक करत उपस्थितांचे स्वागत केले. दिव्यांगांना कुबडी तसेच हातमागाचे वाटप केल्याबद्दल म्हात्रे प्रतिष्ठानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. प्राप्त दोन हातमागावर दिव्यांग बांधव प्रशिक्षण घेत स्वयंपुर्ण होणार असल्याची माहिती दिली. या कार्यक्रमात अप्पर जिल्हाधिकारी माया पाटोळे व म्हात्रे यांच्या हस्ते अ‍ॅड. मोमीन मुसद्दीक व संस्थाध्यक्ष मुदस्सीर रजा यांना सामाजिक कार्यकर्ता या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com