दिव्यांग व्यक्तींनी जॉब कार्ड तयार करून घ्यावे

सभापती आर्की. अश्विनी आहेर
दिव्यांग व्यक्तींनी जॉब कार्ड तयार करून घ्यावे

नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

दिव्यांग व्यक्तीने आप आपल्या गावातील किंवा रोजगार सेवकाकडे दिव्यांग नोंदणी करून जॉब कार्ड तयार करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती तथा महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस, सरचिटणीस आर्की. अश्विनी अनिलकुमार आहेर यांनी केले आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत राज्यातील सर्व ग्रामीण भागातील दिव्यांग व्यक्तीसाठी दिव्यांग आयुक्तालय, पुणे यांनी दि. ८ मे 2020 रोजी आदेशानुसार प्रत्येक ग्रामपंचायत मार्फत दिव्यांग व्यक्तीला रोजगार देण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे सर्व दिव्यांग व्यक्तीने आप आपल्या गावातील किंवा रोजगार सेवकाकडे दिव्यांग नोंदणी करून जॉब कार्ड तयार करून घ्यावे.

तसेच रोजगार हमी योजनेचा एक दिवसाचे रोज 138 रुपये प्रमाणे एका वर्षात किमान शंभर दिवस रोजगार उपलब्ध करून मिळणार आहे.

म्हणजेच 138+100= 13800 रुपये एका वर्षाला दिव्यांगाना याचा लाभ मिळेल. तरी दिव्यांग व्यक्तीने आप आपल्या गावातील ग्रामसेवक किंवा रोजगार सेवकाकडे त्वरित नोंदणी करून घ्यावी. तसेच आपल्या गावातील ग्रामसेवक व ग्राम रोजगार सेवकाकडून अधिक माहिती घ्यावी,असे आवाहनही सभापती अश्विनी आहेर यांनी केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com