विकासात खोडा घालणार्‍यांना जनता धडा शिकवेल: आ. अहिरे

विकासात खोडा घालणार्‍यांना जनता धडा शिकवेल: आ. अहिरे

देवळाली कॅम्प । वार्ताहर | Devali Camp

देवळाली विधानसभा मतदारसंघातील (Deolali Assembly Constituency) ग्रामीण भागासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असलेला

निधी (fund) शासकीय सेवेत असलेल्या अहिरराव भगिनींनी पदाचा दुरुपयोग करत रद्द केल्याने शेतकर्‍यांचे (farmers) मोठे नुकसान होत आहे. शेतकरीच आता या भगिनींना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.

हिंमत असेल तर या भगिनींनी शासकीय सेवेचा राजीनामा (resignation) देऊन समोरासमोर निवडणूक (election) लढवावी, असे खुले आव्हान आ. सरोज अहिरे (MLA Saroj Ahire) यांनी दिले. देवळाली विधानसभा मतदार संघात आ. अहिरे यांचे विरोधात राजकीय वातावरण तापविण्यासाठी अहिरराव भगिनी कटकारस्थान करत असल्याने त्यांच्या या कृत्यामुळे जनतेचे होत असलेल्या नुकसानाबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत आ. अहिरे यांनी अहिरराव भगिनी विरोधात जोरदार हल्ला चढवला.

यावेळी आ. अहिरे यांनी राज्यघटनेने सर्वांना निवडणूक (election) लढविण्याचा अधिकार दिलेला आहे. सेवेत असलेल्या अहिराव भगिनींनीही तो गाजवण्याला आपला कुठलाही विरोध नाही. परंतु देवळाली मतदारसंघात (Deolali Constituency) गेल्या कित्येक वर्षापासून प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लावत असताना त्याला कुठेतरी खीळ घातली जात आहे. वालदेवी धरणाच्याखाली (Valdevi Dam) असलेल्या गावात दहा केटी वेअर बांधण्यात आलेले आहेत. परंतु दूरदृष्टी अभावी त्यांची कार्यक्षमता कमी झाली आहे.

ती वाढविणे गरजेचे आहे. त्यामुळे आजूबाजूच्या शेतीला त्याचा मोठा लाभ होणार आहे. ही बाब लक्षात घेऊन मी जलसिंचन विभागाकडे (Irrigation Department) या बंधार्‍याच्या दुरुस्तीसाठी प्रस्ताव दिला. त्याचा अधिकारी वर्गाकडे पाठपुरावा केला. सदरचे काम होणार असल्याने या भागातील शेतकरी आनंदात होता. मात्र जलसंपदा विभागात कार्यरत असलेल्या अधिकारी अलका अहिरराव यांनी सदरचा निधी रद्द करण्याचे कुटील कारस्थान केले. त्यामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले.

याबाबत आपण नागपूर हिवाळी अधिवेशनात देखील प्रश्न उपस्थित केलेला आहे. आपण करत असलेले विकासकामे रद्द करून आपणास अडचणीत आणण्याचे काम अलका अहिरराव व राजश्री अहिरराव या करत असल्याचा आरोप यावेळी आ. अहिरेनी केला. यावेळी पत्रकारांच्या प्रश्न उत्तर देताना आ. अहिरे यांनी सांगितले की, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी एकमेकांच्या बरोबरीने काम केल्यास जन विकासाची कामे मार्गी लागतात अनेक अधिकारी यात पुढाकार घेत असतात मात्र काही अधिकारी राजकीय इच्छा शक्तीच्या मुळे आपल्या कामांना विरोध करीत असल्याचे चित्र सध्या दिसत आहेत.

अहिरराव यांना देवळाली मतदारसंघात निवडणूक लढवायची असेल तर स्वागत आहे. परंतु जनतेची सेवा करण्यासाठी जनतेचे अडवणूक करणे हा मार्ग नाही हे त्यांनी लक्षात घेतले पाहिजे. अहिरराव भगिनींनी आपल्या विरोधात कट कारस्थान रचने थांबवावे. अन्यथा मार्च महिन्याच्या अधिवेशनात त्यांच्या विरोधात मी हक्कभंग दाखल करणार असून तसा मला अधिकार असल्याचा इशारा आमदार सरोज अहिरे यांनी दिला. याप्रसंगी विष्णुपंत म्हैसधुणे, सोमनाथ बोराडे, विक्रम कोठुळे, रत्नाकर चुंभळे, बाळासाहेब म्हस्के, निवृत्ती कापसे, रमेश काळे, प्रभाकर थोरात, पवन कहांडळ, रवींद्र धुर्जड आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com