विरोधकांना जनताच उत्तर देईलः आ.बनकर

विरोधकांना जनताच उत्तर देईलः आ.बनकर

पिंपळगाव बसवंत । प्रतिनिधी | Pimpalgaon Baswant

पिंपळगाव बसवंत (Pimpalgaon Baswant) शहराच्या सर्वांगीण विकासासाठी (Development) तालुक्याचा लोकप्रतिनिधी व पिंपळगावाचा भूमिपुत्र म्हणून जे-जे काही करता येईल ते आजवर प्रामाणिकपणे केले.

गेल्या काही वर्षात नगरीत जितकी कामे मार्गी लागली नाहीत तितकी कामे गेल्या पाच वर्षात मार्गी लागल्याने शहराच्या वैभवात भर पडली. पिंपळगाव शहरातील जनता सुज्ञ आहे. विरोधकांच्या आरोपाला योग्यवेळी उत्तर देईल.

पिंपळगावकरांनी कोणत्याही भूलथापांना बळी न पडता विकासाला (Development) साथ देत विकास करणार्‍यांच्या पाठी कायम राहावे असे आवाहन आमदार दिलीप बनकर (MLA Dilip Bankar) यांनी केले आहे. घोडके नगर मधील स्व.अशोकराव बनकर उद्यानाचा लोकार्पण सोहळा आमदार दिलीप बनकर यांच्या हस्ते तसेच सरपंच अलका बनकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.

त्यावेळी बनकर बोलत होते. याप्रसंगी निफाड एज्युकेशन सोसायटी चेअरमन बाळासाहेब बनकर (Niphad Education Society Chairman Balasaheb Bankar), स्व.अशोकराव बनकर पतसंस्थेचे चेअरमन रामभाऊ माळोदे, सुरेश खोडे, संपत विधाते, सोमनाथ मोरे, सोहनलाल भंडारी, रवींद्र मोरे, शंकरलाल उपसरपंच बापू कडाळे, सदस्य गणेश बनकर, संजय मोरे, रुक्मिणी मोरे, सत्यभामा बनकर, शीतल बनकर, दीपक विधाते, अंकुश वारडे, दीपक मोरे, रामकृष्ण खोडे, राहुल बनकर, गफ्फार शेख, अरविंद जाधव, चंद्रकांत राका, कांतिलाल पटेल, नारायण पोटे, श्रीकांत वाघ, बाळा बनकर आदी उपस्थित होते.

आ. बनकर पुढे म्हणाले की, पिंपळगाव शहराला (Pimpalgaon City) विकास आत्तापर्यंत 60 कोटी रुपये मिळवून दिले. शहरासाठी तब्बल 38 कोटींची वाढीव पाणीपुरवठा योजना (Water Supply Scheme) शासनदरबारी पाठपुरावा करून मंजूर करून आणली. त्या योजनेचे काम लवकरच सुरू होणार असल्याने पुढील 25 वर्ष पिंपळगावला पाणी कमी पडणार नाही असा विश्वास आ. बनकर यांनी व्यक्त केला.

2017 च्या ग्रामपालिका निवडणुकीत (election) पिंपळगावकरांनी सरपंच अलका बनकर सदस्यांना एकहाती निवडून देत विश्वास दाखवला. विकास कामांमधून त्याची उतराई करण्याचे काम गेल्या पाच वर्षात केल्याचे गणेश बनकर यांनी स्पष्ट केले. सोमनाथ मोरे, सोहनलाल भंडारी, सुरेश खोडे, रोहित घोडके आदींनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी पिंपळगाव बसवंत शहरातील ग्रामस्थ उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com