Aadhar card center
Aadhar card center|दिंडोरी : ‘आधार’अभावी अनेक निराधार
नाशिक

दिंडोरी : ‘आधार’अभावी अनेक निराधार

Gaurav Pardeshi

Gaurav Pardeshi

हतगड । Hatgad वार्ताहर

सुरगाणा तालुक्यात आधार केंद्र नसल्याने आधारच्या युगात सुरगाणा तालुका निराधार झाला आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांसह व शालेय विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहे.

सध्याच्या युगात कुठल्याही शासकीय कामासाठी तसेच शालेय प्रवेशासाठी आधारकार्ड आवश्यक असते आणि अपडेट करणे ही गरजेचे आहे, परंतु सुरगाणा तालुक्यात आधार केंद्र नसल्याने नागरिकांना नाशिक, वणी, दिंडोरी अशा ठिकाणी धाव घ्यावी लागत आहे. सध्याच्या काळात परिवहन महामंडळाच्या बस बंद आहेत.

खासगी वाहनात भाडे खर्च करून त्या ठिकाणी गेले तरी काम होत नसल्याने नागरिकांना मनस्ताप व आर्थिक भार सोसावा लागत आहे.

सुरगाणा तालुक्यातील प्रमुख बाजारपेठ असणार्‍या सुरगाणा, बार्‍हे, मनखेड, पळसन, उंबरठाण, बोरगाव, माणी या ठिकाणी आधार केंद्र सुरू करण्यात यावे अशी मागणी तालुक्यातील नागरिकांकडून होत आहे.

Deshdoot
www.deshdoot.com