शासनाच्या योजनांचा लाभ जनतेला मिळाला पाहिजे: आ. बनकर

शासनाच्या योजनांचा लाभ जनतेला मिळाला पाहिजे: आ. बनकर

निफाड। प्रतिनिधी | Niphad

केंद्र आणि राज्य यांच्यातील राजकारण (politics) चालूच राहील. सामान्य नागरिकाला त्याचेशी काही देणे-घेणे नाही. मात्र योजना कोणाचीही असो त्याचा लाभ जनतेला झाला पाहिजे त्यासाठी विकासकामात राजकारण आणता कामा नये.

शासनाकडून तालुक्यासाठी जास्तीत जास्त निधी (fund) आणून हा तालुका समस्यामुक्त करण्याला माझे प्रथम प्राधान्य असणार असल्याचे प्रतिपादन आमदार दिलीप बनकर (mla dilip bankar) यांनी केले आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयात आयुष्यमान आरोग्य मेळाव्याचे उद्घाटन आमदार दिलीप बनकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर पं.स. च्या सभागृहात आयोजित विविध योजनांमधून लाभार्थ्यांना धनादेश वाटप (Check distribution) तसेच तहसील, प्रांत कार्यालयास संगणक (computer), प्रिंटर (printer), स्कॅनर (scaner) वाटप प्रसंगी आमदार बनकर बोलत होते.

लोकप्रतिनिधी या नात्याने तालुक्यातील प्रत्येक गावात आणि शहरांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळाला पाहिजे. त्यासाठी संबंधितांनी वेळेत प्रस्ताव दिले पाहिजे. मात्र काही ठिकाणी प्रस्ताव दिले जात नसल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे विकासकामात राजकारण आणून जनतेला विकासकामांपासून दूर ठेवू नये असा सल्लाही बनकर यांनी दिला.

यावेळी पं.स. च्या सभागृहात 14 लाभार्थ्यांना स्व.गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत (Gopinath Mundhe Farmers Accident Insurance Scheme) प्रत्येकी 2 लाख रुपयांचे धनादेश वाटप करण्यात आले. तर संजय गांधी कुटूंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत (Sanjay Gandhi Family Financial Assistance Scheme) 15 लाभार्थ्यांना प्रत्येकी 20 हजार रुपयांचे धनादेश वाटप करण्यात आले.

त्यानंतर करोना (corona) काळात मृत झालेले महसूल कर्मचारी चंद्रकांत साळवे यांच्या वारसांना 50 लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. त्यानंतर आमदार निधीतून (MLA fund) प्रांत व तहसील कार्यालयात कामकाजाकरिता संगणक, प्रिंटर, स्कॅनर उपलब्ध करून देण्यासाठी 10 लाख 48 हजार रुपये किमतीचा धनादेश देण्यात आला. तर निफाड (niphad) येथील उपअधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयास (Land Records Office) ई.टी.एस मशीन (ETS machine) देण्यात आले. जेणेकरून शेतकर्‍यांची (farmers) जमिन मोजणी अद्यावत व जलद होईल. याबरोबरच महसूल व कृषी विभाग (Department of Revenue and Agriculture) यांचे वतीने चेक व कॅम्प्युटर वाटप करण्यात आले.

सध्या संपूर्ण राज्यभरात ग्रामस्वच्छता अभियान (Gram Swachhta Abhiyan) सुरू असून पं.स. सभागृहात कार्यक्रमानिमित्त आलेले आमदार बनकर यांना पं.स. आवारातच घाणीचे साम्राज्य दिसल्याने त्यांनी याबाबत नाराजी व्यक्त करून गटविकास अधिकारी यांना सूचना दिल्या. पं.स. च्या सभागृहात आयोजित कार्यक्रमाप्रसंगी प्रांत डॉ.अर्चना पठारे, तहसीलदार शरद घोरपडे, गटविकास अधिकारी संदिप कराड,

पो.नि. रंगराव सानप, तालुका कृषी अधिकारीी भटू पाटील, उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.सुनील राठोर, डॉ.रोहन मोरे, डॉ.पंकज गाजरे, डॉ.सुजित कोशिरे, डॉ.साहेबराव गावले, नगरसेवक सागर कुंदे, जावेद शेख, राजेंद्र बोरगुडे, शिवाजी ढेपले, मधूकर शेलार, महेश चोरडिया, गोपाळ कापसे, उन्मेश डुंबरे, मारूती सांगळे, गणेश कापसे, दिलीप कापसे आदींसह प्रांत, तहसील, पंचायत समिती, भूमि अभिलेखचे कर्मचारी, ग्रामस्थ व तालुक्यातील लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जनाजा चा निधी परत गेला मुस्लिम समाज बांधवांच्या अंत्ययात्रेसाठी आमदार निधीतून जनाजाची मागणी करण्यात आली होती. मात्र दोन वेळा पत्र देवून देखील नगरपंचायतीने ठराव न दिल्याने व आता मार्च महिना संपल्याने यासाठी आलेला 15 लाख रुपयांचा निधी परत गेला आहे. मुस्लिम बांधवांसाठी आलेला निधी नाकर्तेपणामुळे परत गेल्याचे दु:ख वाटते. नगरपंचायतीने पुन्हा एकदा ठराव करून सदर ठरावाची प्रत द्यावी व समाजाला विकासकामांपासून वंचित ठेवू नये.

- जावेद शेख, नगरसेवक (निफाड)

Related Stories

No stories found.