
नवीन नाशिक | प्रतिनिधी
अंबड परिसरात विविध ठिकाणी रस्त्यांवर मोठ्याप्रमाणात खड्डे पडल्याने दिवसेंदिवस अपघाताच्या प्रमाणात वाढ होत आहे. पावसाळा अवघ्या महिन्यावर येऊन ठेपला आहे त्यामुळे पावसाळ्यापूर्वी रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवावे अशी मागणी शिवसेना शाखा प्रमुख शरद रामदास दातीर यांच्यासह परिसरातील रहिवाशांनी बांधकाम विभागाकडे केली असून यासंदर्भातील निवेदन बांधकाम विभाग अधिकारी हेमंत पठे यांना दिले आहे.
अंबड गावानजीक असलेल्या फ्लोरा टाऊन, ग्लोबल व्हिजन स्कुल परिसर, वृंदावन नगर, अंजनी रो-हाऊस, आनंदसागर सोसायटी, आलाप रो-हाऊस, कृष्णकुंज सोसायटी, शिवपार्क सोसायटी, पद्मश्री सोसायटी, कृष्णविहार सोसायटी आदी परिसरातील रस्त्यांचे खडीकरण व डांबरीकरण न झाल्याने रस्त्यांवर खड्यांचे साम्राज्य पसरले आहे.
याठिकाणी दररोजच अपघाताच्या प्रमाणात वाढ होत असून या परिसरात पाणी साचल्याने चिखल देखील होत आहे. याचा त्रास परिसरातील रहिवाशांना मोठ्या प्रमाणात सहन करावा लागत असल्याने पावसाळ्यापूर्वी या रस्त्यांचे कामे पूर्ण करावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या निवेदनावर शिवसेना शाखाप्रमुख शरद रामदास दातीर, स्वप्निल शिरसाठ, निखिल दातीर , संतोष फडोळ, उमेश गडाख,सतीश शिंदे ,अभिमान काळे , सुरेश पाटील,शिवाजी सायखेडे, सागर पाटील ,योगेश लोहार,श्लोक ढवळे,योगेश छल्लारे , सुनंदा सानप ,राजेंद्र खातळे,शांताराम तोरवणे ,दत्तू फडोळ ,ऋषीकेश फडोळ ,मिलिंद जाधव यांचेसह परिसरातील नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.