डा‍क विभागाची 'या' तारखेला पेन्शन अदालत

; निवृत्तीवेतन धारकांना २४ ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार
भारतीय डाक विभाग
भारतीय डाक विभाग

नाशिक | Nashik

डाक विभागातील (Department of Posts) सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनासंबंधी तक्रारींचे निवारण करण्यासाठी पोस्टमास्तर जनरल, नवी मुंबई रिजन यांचे कार्यालय, दुसरा मजला पनवेल मुख्य पोस्ट ऑफिस इमारत नवीन पनवेल, रायगड येथे ३१ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी १२ वाजता पेन्शन अदालतीचे (Pension Court) आयोजन करण्यात आले आहे...

त्या अनुषंगाने पेन्शन व परिवार पेन्शन घेणाऱ्या व्यक्तींनी विहित नमुन्यातील आपले अर्ज २४ ऑगस्ट २०२३ पर्यंत कार्यालयात सादर करावे, असे नाशिक डाकघर विभागाचे प्रवर अधिक्षक यांनी कळविले आहे. या पेन्शन अदालतीमध्ये कायदेशीर मुद्यांसह प्रकरणे, ई वारसा प्रमाणपत्र, कल्पित पेन्शन, टी.बी.ओ.पी/एम.ए.सि.पी पदोन्नती, वेतनश्रेणी वाढविणे, धोरणात्मक बाबींसह शिस्तभंगाच्या (Discipline) तसेच डीपीसीच्या पुनरावलोकनासाठी प्रलंबित प्रकरणांचा विचार केला जाणार नाही.

त्याचप्रमाणे २४ ऑगस्ट २०२३ या तारखेनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा पेन्शन अदालतमध्ये अंतर्भाव केला जाणार नाही. अर्जाचा विहित नमुना टपाल कार्यालयात (Post Office) उपलब्ध असून संबंधितांनी मुदतीत आपले निवृत्ती वेतनासंबंधित तक्रारी अर्जवरील पत्त्यावर वेळेत सादर करावेत, असे आवाहन प्रवर अधिक्षक यांनी केले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com