
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
छंद माणसाला वय विसरायला लावतं, त्याचा प्रत्यय अविनाश कुलकर्णी यांच्या चित्र प्रदर्शनात येतो. त्यांचे चित्र प्रदर्शन पी एन गाडगीळ अँड गॅलरी, नाशिकरोड येथे आयोजित करण्यात आले आहे. उद्घाटन इंटरनॅशनल आर्टिस्ट प्रफुल्ल सावंत यांच्या हस्ते दि. 4 फेब्रुवारी ते ते 11 फेब्रुवारीपर्यंत सायंकाळी 4 खुले राहणार आहे...
कुलकर्णी यांनी वयाच्या 67 व्या वर्षी हा छंद जोपासून त्यात प्रगती करण्याचा चंग बांधला. इच्छाशक्ती आणि प्रयत्नाने कुठलीही कला कुठल्याही वयात शिकता आणि साध्य करता येऊ शकते हे त्यांनी स्वयंअध्ययनातून सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे.
अविनाश कुलकर्णी हे स्टेट बँक ऑफ इंडियातून डिसेंबर 2014 साली निवृत्त झाले. त्यानंतर, त्यांनी स्वतःला सामाजिक कार्याशी जोडून अवयवदान व देहदानच्या प्रचार, प्रसार व समाज प्रबोधनाच्या हेतूने सुनील देशपांडे व फेडरेशन ऑफ बॉडी अँड ऑर्गन डोनेशन, मुंबई यांच्या सहयोगाने मुंबई ते गोवा, मराठवाडा व पुणे ते सातारा अशा 50 ते 52 दिवसांच्या पदयात्रा केल्या. गेल्या दीड वर्षांपासून त्यांनी पेन्सिल पोट्रेटच्या स्वअभ्यासाला सुरुवात करून आता प्रदर्शन भरवले आहे.