
नवीन नाशिक । प्रतिनिधी New Nashik
बायोमेडिकल वेस्ट सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर टाकल्याप्रकरणी नवीन नाशिक घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे 25 हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली.
बायोमेडिकल वेस्ट कचरा गोळा करणारी गाडीमध्ये टाकला गेला पाहिजे त्यासाठी रजिस्ट्रेशनची आवश्यकता असते. त्याची फी वजनाप्रमाणे भरायची असते. काही हॉस्पिटल क्लिनिक ते पैसे वाचवण्यासाठी उघड्यावरती सदरचा कचरा टाकतात. सदरहू कचरा हा अतिशय घातक असून त्यामध्ये सुई आणि सिरीज एक्सपायरी औषध त्यामुळे नागरिकांचा आरोग्य धोक्यात येऊ शकतो. इम्पॅक्टेड नीडल सिरीजमुळे लोकांना विविध प्रकारचे आजार होऊ शकतात. कम्युनिकेबल डिसीज उदाहरण एचआयव्ही आणि इतर गंभीर आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्या अनुषंगाने महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या आदेशानुसार व संचालक घनकचरा विभाग डॉ. कल्पना कुटे यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे विभागीय अधिकारी डॉ. मयूर पाटील व विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली नवीन नाशिक घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत सार्वजनिक रस्त्यावर बायोमेडिकल वेस्ट टाकल्याप्रकरणी जगतापनगर येथील विघ्नहर्ता क्लीनिकवर केस करून त्यांच्यावर 25 हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली.
नवीन नाशकातील सर्व हॉस्पिटल्स क्लिनिक मेडिकल यांना आवाहन करण्यात येत आहे की, कोणीही बायोमेडिकल वेस्ट रस्त्यावर अथवा सार्वजनिक ठिकाणी इतरत्र टाकू नये अन्यथा नियमाप्रमाणे गुन्हा दाखल करून दंडात्मक कारवाई करण्यात येईल. वैद्यकीय विभागाकडे बायोमेडिकल रजिस्ट्रेशन करावे. ज्या क्लिनिक हॉस्पिटलचे रजिस्ट्रेशन नसेल अशा हॉस्पिटलवर मनपाच्या वैद्यकीय विभागामार्फत नियमानुसार कारवाई करण्यात येईल.
-संजय गांगुर्डे, विभागीय स्वच्छता निरीक्षक, नवीन नाशिक