त्र्यंबकेश्वर । Trimbakeshwer

पेगलवाडी (त्रिंबक) ग्रामपंचायतीने ग्रामस्थांनी पाणीपट्टी भरली नाही, म्हणून नळाद्वारे होणारा पाणीपुरवठा बंद केला आहे. पेगलवाडी ग्रामस्थांकडे पाणीपुरवठ्याची ४० टक्के थकबाकी असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

मागील दोन वर्षांपासून पेगलवाडी ग्रामपंचायतीने पाणीपट्टी वाढवली आहे. त्यातही ग्रामस्थांना पाणीपुरवठा दिवसाआड होत असल्याचा नागरिकांनी सांगितले आहे. त्यामुळे ग्रामस्थ पाणीपट्टी भरण्यास टाळाटाळ करीत असल्याचे ग्रामपंचायतीचे म्हणणे आहे. त्याचा परिणाम आता महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.

नाशिक-त्र्यंबकरोड प्रयोग तीर्थाच्या समोरून जाणार्या रोड कडे पेगलवाडी ग्रामपंचायत वसलेली आहे. पहिणे बारी व प्रदक्षिणेचा मार्ग पेगलवाडी जवळून जात असल्याने पेगलवाडी ग्रामपंचायत प्रसिद्ध आहे. गौतमी बेझे धरणातून पेगलवाडीला पाणी पुरवठा होतो. असे असले तरी पाण्याचा तुटवडा निर्माण होत असल्याने महिलांच्या डोक्यावरील हंडा कायम आहे.