
पेठ | प्रतिनिधी Peth
पेठ ( Peth ) शहरातून जाणाऱ्या महामार्गावर मध्यरात्री दरम्यान तालुक्यातील डोमरवडक ( Domarvadak) येथील रहिवाशी असलेले कृष्णा महादू जाधव वय - ४५ वर्ष यास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने रस्त्यालगतच्या इमारतीच्या ओट्यावरच जखमी अवस्थेत मृत्युमुखी पडल्याचा प्रकार सकाळी ८ वाजेदरम्यान निर्दशनास आला .
मृताच्या खिश्यातील कागदपत्रांमुळे ओळख पटलेल्या नातेवाईकांच्या उपस्थितीत शवविच्छेदन करण्यात येऊन धर्मराज महादू जाधव यांच्या फिर्यादीवरुण पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनच्या विरुद्ध अपघाताचा गुन्हयाची नोंद करण्यात आली असुन पो . नि . दिवानसिंग वसावे यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.उ.नि . जाडर अधिक तपास करीत आहेत .