सातपूरला ईदनिमित्त शांतता समितीची बैठक

सातपूरला ईदनिमित्त शांतता समितीची बैठक
USER

सातपूर | Satpur

जिल्ह्यासह शहरात (Nashik District) करोनाचा वाढता प्रादुर्भाव (Corona Crisis) लक्षात घेता यावर आळा घालण्यासाठी प्रशासनाने निर्बंध कडक केले आहेत.

सातपूर शहरातील (Satpur City) येत्या २१ तारखेला मुस्लिम बांधवांचा पवित्र सण बकरी ईद (Bakri Eid) सण समाज बांधव नमाज पठण करण्यासाठी मस्जिदमध्ये येत असतात.

यासंदर्भात सातपूर पोलिस ठाण्यात शांतता समितीची बैठक आयोजीत करण्यात आली होती.

दरम्यान करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मुस्लिम बांधवांनी यावर्षी बकरी ईद सण आपल्या घरातच साजरा करावा, असे आवाहन सातपूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस (Satpur Police Station) निरीक्षक किशोर मोरे यांनी केले.

शांतता कमिटीच्या बैठकीत (Committee Meeting) मुस्लिम बांधवांनी या वर्षीदेखील घरातच नमाज पठण करून ईद साजरी करावी, असे आवाहन रजिया मज्जित ट्रस्टचे सेक्रेटरी हाजी फारुक भाई व पदाधिकारी यांच्यावतीने देखील करण्यात आले आहे.

या बैठकीला मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वरूपात निवडक लोकां सोबत मस्जिदमध्ये नमाज पठण करण्यात आले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com