अंबड पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक

अंबड पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक

नवीन नाशिक | प्रतिनिधी New Nashik

गणेशोत्सवाच्या ( Ganesh Festival )पार्श्वभूमीवर अंबड पोलीस ठाण्याची ( Ambad Police Station ) शांतता समितीची बैठक (Peace Committee Meeting)सहाय्यक आयुक्त सोहेल शेख,अंबड पोलीस ठाण्याचे वपोनी भगीरथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

यावेळी गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याकरिता पोलिसांनी मार्गदर्शक सूचना केल्या. यावेळी गणेश मंडपामुळे रहदारीस अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घेणे, जबरदस्तीने कोणाकडूनही वर्गणी मागू नये, गणेश मंडळाचे ठिकाणी दाखविण्यात येणारे देखावे हे आक्षेपार्ह अगर सामाजिक तेढ निर्माण होणार नाही अशा प्रकारचे ठेवावे,गणेश मंडळाचे ठिकाणी स्वयंसेवक, सीसीटीव्ही कॅमेरे लावणे बाबत सूचना देण्यात आल्या.

यावेळी गणेश उत्सव मंडळाचे पदाधिकारी यांना सर्व विभागाच्या परवानगी घेणे बाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी विविध मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मांडलेल्या समस्यांबाबत माहिती घेण्यात आली व सदर समस्या सोडवणे बाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना कळविण्यात आले.

यावेळी आमदार सीमा हिरे,माजी नगरसेविका प्रतिभा पवार,शिवाजी बर्के,कृष्णा काळे,मुकेश शेवाळे,हर्षल चव्हाण,शुभम पाटील,आदींसह अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नंदन बगाडे,पोलीस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर,सपोनी गणेश शिंदे,सपोनी वसंत खतेले,

उपनिरीक्षक संदीप पवार,उपनिरीक्षक किरण शेवाळे,उपनिरीक्षक प्रकाश कातकडे,अंमलदार सचिन सोनवणे,अशोक आव्हाड,संदीप निर्मळ,अनिल ढेरंगे,प्रशांत नागरे,रवी शिरोळे आदींसह मनपा नवीन नाशिक विभागीय कार्यालयातील अधिकारी, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे अधिकारी, अग्निशमन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com