मनपाकडून 'इतक्या' कोटींची देयके अदा

मनपाकडून 'इतक्या' कोटींची देयके अदा

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक शहर परिसरात मोठ्या प्रमाणात विकास कामे ( Development Works )सुरू आहेत. यामध्ये प्रामुख्याने रस्त्याची कामे ( Road Works )प्रगती पथावर आहेत तर नुकतेच आर्थिक वर्ष संपले.या शेवटच्या महिन्यात महापालिकेच्या वतीने तब्बल सुमारे दोनशे कोटी रुपयांची देयके अदा करण्यात आली आहे(Payments were made ). आर्थिक वर्षांतील अखेरच्या महिन्यात महापालिकेच्या लेखा विभागाकडून 100 टक्के देयके अदा झाली आहेत. यात सुमारे दीड हजार बिलांचा समावेश होता.

मार्चअखेर तब्बल 203 कोटींची बिले लेखा विभागामध्ये दाखल झाली आहे. 31 मार्च या अखेरच्या दिवशी जवळपास 50 कोटींची बिले सादर झाली होती. दरम्यान, आता लेखा विभागात उपलब्ध तरतूद कमी होती. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात तत्कालीन आयुक्त कैलास जाधव यांनी 2021-22 या आर्थिक वर्षाकरिता महापालिकेचे 2361.53 कोटी रुपयांचे प्रारूप अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर केले होते.

स्थायी समितीने त्यात 405.25 कोटी रुपयांची वाढ दर्शवित 2763.81 कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकाला मंजुरी दिली होती. तर महासभेने त्यात 123.23 कोटी खर्चात वाढ करून 2883.21 कोटींवर अंदाजपत्रक पोहोचवले. गेल्या दोन वर्षांत करोनामुळे महापालिकेचे उत्पन्न जवळपास पाचशे कोटी रुपयांनी घटले होते. महापालिकेकडे उपलब्ध निधी कमी असून दुसरीकडे दोनशे कोटींची बिले काढून घेण्यासाठी ठेकेदारांनीही लेखा विभागात गर्दी केली होती.

गेल्या दोन वर्षांत जवळपास सहाशे कोटींचे रस्ते तसेच अडीचशे कोटी रुपयांच्या उड्डाणपुलाला मान्यता मिळाली असून दुसरीकडे सिटी बस, उद्यान, घनकचरा विभाग, पाणीपुरवठा, बांधकाम विभागातील बिलांचा सर्वाधिक समावेश आहे. मार्चअखेर आर्थिक वर्ष संपत असल्यामुळे आठवडाभरात महापालिकेच्या वित्त व लेखा विभागाकडे जवळपास 203 कोटींची बिले ठेकेदारांनी सादर केली होती. ते सर्व अदा करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

Related Stories

No stories found.