
दिंडोरी | प्रतिनिधी | Dindori
रयत शिक्षण संस्थेचे (Rayat Shikshan Sanstha) जानोरी (Janori) येथील महात्मा फुले विद्यालयात (Mahatma Phule Vidyalaya) कार्यरत असलेले उपशिक्षक बापू दिवे (Bapu Dive) यांची कन्या पायल दिवे (Payal Dive) हिची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात आलेल्या परिक्षेत महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा (Water Resources) या विभागात सहाय्यक अभियंता (Assistant Engineer) पदासाठी निवड झाली आहे....
पायल ही रयत शिक्षण संस्थेची विद्यार्थिनी असून तिचे रयत शिक्षण संस्थेचे विविध शाखेत इयत्ता 12 वी पर्यंतचे शिक्षण झाले आहे. वीरमाता जिजाबाई टेक्नोलॉजिकल इंन्स्टिट्युट, माटुंगा, मुंबई युनिव्हसिर्ंटी येथे अभियात्रिकी पदवी पर्यंतचे शिक्षण सन 2018 या साली पूर्ण केले.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2019 मध्ये झालेल्या परिक्षेचा निकाल नुकताच लागला असून यामध्ये पायल दिवे हिची निवड झाली आहे. पहिल्याच प्रयत्नात यश मिळण्यासाठी पायलने घेतलेल्या परिश्रमाचे व तिचे वडील बापू दिवे यांनी केलेल्या मार्गदर्शनाचे परिसरातून कौतुक होत आहे.