मका खरेदीची रक्कम त्वरित द्यावी

खा.डॉ.भारती पवार यांची पत्राद्वारे मागणी
मका खरेदीची रक्कम त्वरित द्यावी

नाशिक । प्रतिनिधी Nashik

मका खरेदीची देय असलेली रक्कम शेतकऱ्यांना त्वरित वर्ग करावी,अशी मागणी खा.डॉ.भारती पवार यांनी केंद्र व राज्य व शासनाकडे केली आहे.

केंद्र सरकारच्या आधारभूत धान्य खरेदी योजना २०२०-२१ अंतर्गत नाशिक जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांकडून मका खरेदी केली गेली. सध्या शेतीचा हंगाम सुरू असल्याने शेतकऱ्यांना शेतीसाठी भांडवलाची नितांत आवश्यकता आहे.परंतु , अद्यापही त्यांच्याकडून खरेदी केलेल्या मक्याची रक्कम खात्यावर वर्ग झाली नसल्याने मका उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.

तरी शेतकऱ्यांच्या खात्यावर मका खरेदीची देय असलेली रक्कम लवकरात लवकर वर्ग करून त्यांना दिलासा द्यावा,अशी मागणी खा.डॉ.भारती पवार यांनी राज्याचे अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ व केंद्रीय खाद्य व सार्वजनिक वितरण विभाग मंत्रालय नवी दिल्ली यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com