टीईटी उत्तीर्ण शिक्षकांना वेतन द्या, मुख्याध्यापक संघाची मागणी
नाशिक

टीईटी उत्तीर्ण शिक्षकांना वेतन द्या, मुख्याध्यापक संघाची मागणी

Bharat Pagare

नाशिक | Nashik

महाराष्ट्र परीक्षा परिषदेतर्फे जानेवारीत घेण्यात आलेल्या टीईटी परीक्षेचा निकाल लागल्याने या परीक्षेत उत्तीर्ण शिक्षकांचे वेतन त्वरित सुरू करण्याची मागणी नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाने प्राथमिक शिक्षणाधिकारी राजीव म्हसकर यांना दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.

नाशिक जिल्ह्यातील माध्यमिक व प्राथमिक असे मिळून जवळपास साठहून अधिक शिक्षकांचे टीईटी उत्तीर्ण नसल्यामुळे वेतन रोखण्यात आले असून गेल्या जानेवारीपासून त्यांचे वेतन बंद करण्यात आले आहे. शासनाने ‘टीईटी पास’ असणे अनिवार्य केले आहे. त्यामुळे शिक्षकांचे वेतन रोखले असले तरी यातील बरेचसे शिक्षक टीईटी पास झाले आहेत. तर काही शिक्षकांनी न्यायालयातून लढा देऊन वेतन बंद करू नये असे, आदेश मिळवूनही संबंधित शिक्षकांना वेतनापासून वंचित ठेवले गेल्याचा आरोप मुख्याध्यापक संघाने या केला आहे. या शिक्षकांचे वेतन त्वरित सुरु करावे अशी मागणी मुख्याध्यापक संघातर्फे प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी मुख्याध्यापक संघाचे सचिव एस. बी. देशमुख, उपाध्यक्ष राजेंद्र सावंत, प्रदिप सांगळे, अनिल देवरे, एच. ए. मनियार, मोहन चकोर, भाऊसाहेब शिरसाठ आदी उपस्थित होते.

चाैकट१

प्रस्ताव सादर करा

टीईटी उत्तीर्ण शिक्षकांनी त्यांचे प्रस्ताव त्वरित सादर करण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी राजीव म्हसकर यांनी मुख्याध्यापक संघाच्या पदाधिकाऱ्यांना केले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com