पाच ग्रामसेवकांची वेतनवाढ रोखली

कत्तलखाण्यास परवानगी, दप्तर दिरंगाईचा दोषारोप
पाच ग्रामसेवकांची वेतनवाढ रोखली

नाशिक । प्रतिनिधी Nashik

कत्तलखाण्यास परवानगी देऊ नये असे ग्रामसभेने( Gram Sabha ) सांगूनही परवानगी देणे, दप्तर दिरंगाई, कार्यभार हस्तांतरण न करणे अशा दोषारोपावरुन पाच ग्रामसेवकांवर ( Gram Sevaks ) विभागीय चौकशीनंतर वेतनवाढ (Salary Increment )रोखण्याची कारवाई करण्यात आली आहे.

जिल्हा परिषदेच्या ( Zilla Parishd Nashik )मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक लीना बनसोड यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती ग्रामपंचायत विभागाचे प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चाटे यांनी दिली.

मालेगाव तालुक्यातील सवंदगावचे ग्रामसेवक कैलास चिंतामण निकम यांनी कत्तल खाण्यास परवानगी देऊ नका असे ग्रामसभेने सांगूनही परवानगी दिली. उसवाड (ता.चांदवड)चे राजेंद्र भावराव निकम यांनी दप्तर दिरंगाई केल्याने त्यांच्या दोन वेतनवाढ रोखण्यात आल्या आहेत.

अजंदे (ता.मालेगाव)चे संजय यशवंत शिंदे यांनी ग्रामपंचायत कार्यालयात दप्तर न ठेवणे, कार्यभार हस्तांतरण न करणे या दोषारोपावरून एक वेतनवाढ रोखण्यात आली आहे. मसुर्ली (ता.इगतपुरी) चे ग्रामसेवक अरुण शिवाजीराव गोंधळे हे नेहमी अनधिकृत गैरहजर राहत असल्याने त्यांची एक वार्षिक वेतन वाढ रोखली आहे. अजबराव रुस्तमराव निकम, पिंपळगाव मोर (ता.इगतपुरी) यांच्यावर दप्तर अद्ययावत न ठेवणे या दोषारोपावरुन ही कारवाई करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com