जगण्याइतकी पेन्शन द्या

जगण्याइतकी पेन्शन द्या

शहीद चौकात निवृत्त कामगारांचे आंदोलन

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक जिल्हा ईपीएस 95 पेन्शनर्स फेडरेशनचा (Nashik District EPS 95 Pensioners Federation) मोर्चा केंंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या संपर्क कार्यालयावर आयोजित करण्यात आला होता. मात्र, पोलिसांनी परवानगी नाकारली. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष असल्याने शहिदांना अभिवादन करून हातात तिरंगा घेऊन पेन्शनर्स कामगार देश घडवणारे जगण्याइतकी पेन्शन द्या, अशी मागणी करत शहीद चौकात आंदोलन करण्यात आले.

सन 2013 मध्ये आत्ताचे महाराष्ट्र राज्यपाल भगतसिंग कोशियारी तत्कालीन खासदार होते. तेव्हा राज्यसभेने नेमलेल्या समितीने ईपीएस 95 पेन्शनर्सच्या पेन्शनबाबत समिती नेमली होती. तेव्हा भगतसिंग कोशियारी यांच्या अध्यक्षते खाली नेमलेल्या कमिटीने पेन्शनर्स किमान 3000 रू. पेन्शन महागाई भत्तासह लागू करण्याचे व मोफत आरोग्य सुविधा देण्याची शिफारस केली होती.आता त्याला दहा वर्ष होतील. अद्याप त्यावर कार्यवाही झाली नाही. त्याबाबत आठवण करून देण्यासाठी देशभर आंदोलन झाले.

जगण्यासाठी किमान 9000/- रू पेन्शन महागाई भत्ता सह लागू करा व मोफत आरोग्य सुविधा द्या अशा मागण्या केल्या. 162 अस्थापनातील सेवा निवृत्त कामगारांना तुटपुंजी पेन्शन आहे. सत्तर लाख देशभर पेन्शनर्स आहेत. यात 1000 रुपयेसुध्दा पूर्ण पेन्शन मिळत नाही. 50% पेन्शनर्स 15 ते 2,200 रु. पेन्शन मिळते.

लोकप्रतिनिधींनी दखल घेऊन यासाठी दिल्लीत भूमिका मांडावी व न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी नाशिक जिल्हा ईपीएस पेन्शनर्स फेडरेशनने केली. मोर्चाचे नेतृत्व कॉ. राजू देसले, रमेश सूर्यवंशी, डी. बी. जोशी, चेतन पणेर, सुभाष काकड, प्रकाश नाईक यांनी केले. मोर्चात नामदेव बोराडे, विलास विसपुते, शिवाजी ढोंबळे, व्ही. डी. धनावटे, सुभाष शेळके, नईम शेख (मामू), भाऊसाहेब शिंदे, सुभाष पाटील, एन. के. कांबळे आदींसह शेकडो पेन्शनर्स सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी गंगाथरण डी तसेच भविष्य निर्वाह निधी आयुक्त अनिल प्रीतम यांना निवेदन देण्यात आले.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com