..तर ऑनलाइन शिक्षण बंद

नाशिक स्कूल असोसिएशनचा निर्णय
..तर ऑनलाइन शिक्षण बंद

नाशिक । प्रतिनिधी Nashik

पालकांच्या फी वर चालणार्‍या शाळांना आता ऑनलाइन शिक्षण परवडत नाही, शिक्षकांकडून देखील पूर्ण वेतनाची मागणी केली जात आहे. शाळेचा देखभाल व दुरुस्तीचा खर्च परवडत नसल्याने ज्या पालकांनी नियमित फी अदा केली असेल त्यांच्याच पालकांचे ऑनलाइन शिक्षण सुरू राहणार असून, सात दिवसांच्या आत फी भरावी अन्यथा ऑनलाइन शिक्षण बंद करण्याचा निर्णय स्कूल असोसिएशनने घेतला आहे. याबाबत असोशिएशनने विभागीय शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांची भेट घेऊन निवेदनही दिले.

करोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून शाळांनी पालकांकडे फी साठी तगादा लावला नाही. पालकांना फी भरण्यासाठी जबरदस्ती केली नाही, अडचण असलेल्या पालकांना शाळांनी मदत केली. काही शाळांनी फीमध्ये सवलत दिली. फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवले नाही. विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने दर्जेदार शिक्षण दिले, असे रतन लथ, हिमगौरी आहेर-आडके, सचिन जोशी यांनी म्हटले आहे.

शाळेच्या कर्जाचे हप्ते, स्कूल बसचे हप्ते, शिक्षक व सेवकांचे वेतन, शाळेचे भाडे यावर मोठ्या प्रमाणात खर्च होतो. ऑनलाइन शिक्षणाचा खर्च नियमित शिक्षणापेक्षा अधिक आहे. शिक्षकांच्या वेतनामध्ये 50 टक्के कपात करण्यात आली आहे; परंतु आता शिक्षक वेतनाची उचल मागत आहेत. जे पालक फी भरणार नाहीत त्यांच्या पाल्यांचे ऑनलाइन शिक्षण तात्पुरते बंद ठेवणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com