समस्यांच्या विळख्यात पवननगर मार्केट

वाहतुक कोंडी नित्याची बाब
समस्यांच्या विळख्यात पवननगर मार्केट

नाशिक । खंडू जगताप Nashik

सतरा वर्षे जुनी इमारत, ठिकठिकाणी पडझड, गळती, रस्त्यांवर लागली जाणारे दुकाने, हातगाडे यामुळे सातत्याने वाहतुक कोंडी यासह विविध समस्यांनी पवननगरचे भाजी मार्केट ग्रासल्याचे चित्र आहे.

अंबड, नवीन नाशिक परिसरातील मध्यवर्ती मार्केट म्हणुन पवननगर भाजी मार्केटकडे पाहिले जाते, इतर बाजारांच्या तुलनेत स्वस्त भाजलीपाला मिळण्याचे ठिकाण अशी या मार्केटची ख्याती आहे. यामुळे या मार्केटमध्ये दररोज दुपारनंतर मोठी गर्दी पाहावयास मिळते. बाजाराबाहेरील दुकानांचख्या गाळ्यांसमोरही अनेक व्यावसायिक खाली तसेच हातगाडे घेऊन अर्धा रस्त्यापर्यंत बसलेले असतात. तर बाजाराला येणार्‍या नागरीकांची वाहने पार्क करण्यासाठी या ठिकाणी वाहन पार्किंगची सुविधा नाही.

यामुळे प्रत्येक नागरीक दिव्या ऍडलॅब ते उत्तमनगर व पवननगर स्टॉप ते मटनमार्केट या बाजूच्या रस्त्यांवरच वाहने पार्क करतात. परिणामी दररोज सायंकाळनंतर या ठिकाणी दोन्ही रस्त्यांवर पायी चालण्यासाठीही जागा राहत नाही. दररोजच्या या समस्येमुळे या भागातील रहिवाशी त्रस्त आहेत.

तसेच सणांच्या कालाधीत दसरा, दिवाळी, गणपती, नवरात्र या काळात या ठिकाणी गर्दीला उधान येत असल्याचे दरवर्षीचे चित्र आहे. येथील मार्केट हे 2003 मध्ये बांधले गेलेले आहे. यामध्ये एकुण 180 भाजीचे गाळे आहेत. तर 30 दुकानांचे गाळे आहेत. 17 वर्षे जुने असलेल्या या मार्केटचे स्लॅबचे छत कुझले आहे. प्रत्येक गाळ्याचे छत पावसात गळत असल्याने प्रत्येक व्यावसायिकाने छतास ताडपत्र्या, प्लॉस्टिकचे कागद बांधुन तात्पुरते अच्छादन केले आहे.

अनेक ठिकाणी छताचा भाग तुटला आहे. तर छताचा स्लॅब कोसळण्याचा धोका येथील व्यावसायिकांना कायमच सतावत असतो. यामुळे व्यावसायिक तसेच बाजारासाठी आलेले नागरीकही जखमी होण्याची शक्यता व्यावसायिक व्यक्त करत आहेत. अनेक वर्षांचा जुना झालेला बाजाराची दुरस्ती करण्याऐवजी त्याची नव्याने उभारणी करण्याची मागणी येथील व्यावसायिक तसेच नागरीकही करत आहेत.

नवे बांधकाम व्हावे

येथील भाजीबाजार 17 वर्षांपेक्षा अधिक जुना आहे. त्याचेवळी झालेल्या निकृष्ट बांधकामाच्या परिणामी सध्या संपुर्ण छत जर्जर झालेले आहे. अनेक वेळा छताचा भाग कोसळला आहे. याची दुरस्ती नव्हे तर आता संपुर्ण मार्केटचे नवीन बांधकाम करण्याची गरज आहे.

- संभाजी बच्छाव, व्यावसायिक

करोनाचा विसर

करोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून संपुर्ण लॉकडाऊन काळात पवननगर बाजार कायम पोलीसांसाठी डोकेदुखी राहिला आहे. लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर प्रत्येक व्यावसायिकाने एक या प्रमाणे संपुर्ण बाजारात सॅनिटायझरच्या बाटल्या लटकताना दिसत होत्या. परंतु अवघ्या आठवडभरातच त्याचा व्यावसायिकांना विसर पडला. तर या बाजारातील अनेक व्यावसायिक पॉझिटिव्ही आले होते. सध्या ना व्यावसायिक मास्क वापरत आहेत. ना खरेदी करणारे नागरिक यामुळे करोनाची टांगती तलवार कायम आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com