हरिद्वार येथील कुंभमेळ्यात पट्टाभिषेक सोहळा उत्साहात

हरिद्वार येथील कुंभमेळ्यात पट्टाभिषेक सोहळा उत्साहात

नाशिक । Nashik

मुळचे महाराष्ट्राचे असलेले, ध्यानयोगी म्हणून भारतभर प्रसिद्ध असलेल्या उत्तम स्वामीजी यांना पंचअग्नी आखाड्याचे महामंडलेश्वर बनले आहेत.

सर्व आखाड्यांच्या प्रमुख महंतांच्या उपस्थितीत उत्तम स्वामीजी यांना हरिद्वारच्या कुंभमेळ्यात सनातनधर्म पद्धतीने पट्टाभिषेेक करण्यात आला.

हरिद्वार येथे सध्या कुंभमेळा सुरू आहे. सर्व प्रमुख १३ आखाड्यांचे भारतभरातील प्रमुख आचार्य महामंडलेश्वर, श्री महंत व महंत हरिद्वार येथे जमले आहेत.आतापर्यंत कोणत्याही आखाड्याशी संबधित नसलेले मुळचे महाराष्ट्रातील, पण सध्या राजस्थानमधील बासवाडा येथे वास्तव्य असलेले ध्यानयोगी उत्तम स्वामीजी यांचा भारतभर व विदेशातही भक्त परिवार आहे.

हरिद्वार येथील पट्टाभिषेक सोहळ्यास पंचअग्नी आखाड्याचे महामंडलेश्वर रामकृष्णानंद, सभापती महंत मुक्तानंद ब्रम्हचारी महाराज, महामंत्री महंत सोमेश्वरानंद महाराज, आचार्य महामंडलेश्वर ब्रह्मर्षी रामकृष्णानंद, सचिव संपूर्णानंद महाराज, आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्रगिरी महाराज, महामंडलेश्वर माँ कनकेश्वरी देवी, द्वारिका सनातनी सेवामंडलाचे केशवानंदजी महाराज, रामजन्मभूमी न्यासाचे सचिव चंपकराय, मुक्तानंद यांच्यासह १३ आखाड्यांचे प्रमुख साधुमहंत यांच्यासह भक्तपरिवार उपस्थित होते. रामबाबा यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

महामंडलेश्वर ईश्वरानंदजी

ध्यानयोगी स्वामी उत्तम स्वामीजी यांना पंचअग्नी आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर झाल्याने त्यांना आता महामंडलेश्वर ईश्वरानंदजी म्हणून ओळखले जाणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र गुरुभक्त मंडळाचे अध्यक्ष संजय नागरे यांनी दिली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com