जिल्हा रुग्णालयात रुग्णांना बाह्य रुग्ण विभागाची प्रतीक्षा

जिल्हा रुग्णालयात रुग्णांना बाह्य रुग्ण विभागाची प्रतीक्षा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

करोना काळात (Corona) जिल्हा सामान्य रुग्णालयात अनेक रुग्णांना सेवा मिळाली होती. मात्र, पोस्ट कोविड रुग्णांसाठी पहिल्या लाटेनंतर (Corona First Wave) पालकमंत्री छगन भुजबळ (Guardian Minister Chhagan Bhujbal) यांच्या सूचनेनुसार बाह्यरुग्ण कक्ष (Outpatient Department) स्थापन करण्यात आला होता....

त्याचा वापर अनेक रुग्णांनी केला. मात्र, फेब्रुवारीच्या मध्यवधीपासून दुसरी लाट (Corona Second Wave) सुरू झाल्याने हा कक्ष बंद करण्यात आला होता. आता ही लाट ओसरली असल्याने अनेकांना हा कक्ष पुन्हा सुरू होण्याची प्रतीक्षा आहे.

पहिल्या लाटेत जिल्ह्यातील करोनाबधित रुग्ण व्यवस्थित उपचार घेऊन बरे झाले. मात्र, त्यानंतर होणारे आजार यांवर उपचार व्हावे तसेच या रुग्णांना आरोग्यसेवा देण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच ग्रामीण भागात कोविडपश्चात बाह्यरुग्‍ण विभाग सुरू केला होता.

मात्र, करोना महामारीच्‍या दुसऱ्या लाटेत आरोग्‍य यंत्रणेवर ताण आल्‍याने हा उपक्रम खंडित झाला होता. यानंतर मोठ्या संख्येने नागरिक बाधित झालेले असताना त्‍यांना आता आरोग्‍यविषयक मार्गदर्शनाची आवश्‍यकता आहे. त्‍यामूळे यापूर्वी कार्यरत असलेले पोस्‍ट कोवि‍ड बाह्य रुग्ण विभाग पुन्‍हा कधी सुरू होणार, याकडे या रुग्‍णांचे लक्ष लागून आहे.

राष्ट्रीय स्‍तरावर अनेक ठिकाणी पोस्‍ट कोवि‍ड सेंटरच्‍या (Post Covid Center) माध्यमातून करोनामुक्‍त रुग्‍णांना आरोग्‍यविषयक सल्‍ला दिला जातो आहे. या धर्तीवर नाशिक जिल्‍हास्‍तरावर करोनापश्‍चात बाह्यरुग्‍ण विभाग सुरू केला होता.

पालकमंत्री छगन भुजबळ यांच्‍या सूचनेनुसार करोनाच्‍या पहिल्‍या लाटेनंतर ही सुविधा उपलब्‍ध होती. या सुविधेमधून शहरात, तसेच ग्रामीण रुग्‍णालयांमध्येही बाह्यरुग्‍ण विभागाच्‍या माध्यमातून करोनामुक्‍त रुग्‍णांच्‍या आरोग्‍यविषयक तक्रारींवर उपचार व मार्गदर्शन केले जात होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com