पखालरोडवर रस्त्यांची चाळण
नाशिक

पखालरोडवर रस्त्यांची चाळण

वाहनचालक व नागरिकांना त्रास; महापालिकेने लक्ष देण्याची मागणी

Farooque Pathan

Farooque Pathan

जुने नाशिक | प्रतिनिधी

द्वारका ते अशोका मार्गाला जोडणार्‍या पखालरोडचे पावसाच्या पाण्यामुळे मोठे हाल झाले आहेत. संपूर्ण रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून त्यात पाणी जमा होत असल्यामुळे वाहनधारकांना मोठी कसरत करून आपले वाहन पुढे न्यावे लागत आहे.

त्याचप्रमाणे येथे राहणाऱ्या स्थानिक नागरिक तसेच व्यापारी देखील या खड्ड्यांमुळे त्रस्त झाले आहेत. वेळोवेळी महापालिका प्रशासनाला याबाबत तक्रारी करूनही दखल घेण्यात येत नसल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहेत.

पखालरोड हा अत्यंत वर्दळीचा मार्ग मानला जातो. या ठिकाणी बँका तसेच व्यापारी प्रतिष्ठान आहेत. मात्र, महापालिकेच्या दुर्लक्षामुळे याची मोठी दुरावस्था झाली आहे. या संपूर्ण रस्त्यावर मागील काही काळापासून महापालिकेचे काम देखील सुरू होते.

मात्र ते देखील अर्धवट पडल्यामुळे सर्व मातीत चिखल निर्माण होऊन तो रस्त्यात पसरत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्वरित लक्ष देऊन पखाल रोड दुरुस्त करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com