लालपरी धावू लागल्याने प्रवाशी सुखावले

लालपरी धावू लागल्याने प्रवाशी सुखावले

नांदगाव । प्रतिनिधी | Nandgaon

राज्य शासनात (state government) विलीनीकरणाच्या (Merger) मागणीसाठी संपावर गेलेल्या एस.टी. कर्मचार्‍यांना (S.T. Employees) कामावर परतण्यासाठी न्यायालयाने 22 एप्रिल 2022 ही अखेरची मुदत दिली होती. या मुदतीत नांदगाव (nandgaon) आगारातील एकूण 267 पैकी 233 कर्मचारी कामावर हजर झाल्याने बसस्थानक पुन्हा गजबजले असून प्रवाशी सुखावले आहेत.

नोव्हेंबर 2021 च्या पहिल्या आठवड्यापासून एस.टी. कर्मचार्‍यांनी राज्य शासनात (state governemnt) समावून घ्यावे, या मागणीसाठी संपाचे हत्त्यार उपसले होते. तब्बल 4 महिन्याहून अधिक काळ एस.टी. बसेस (S.T. Bus) डेपोतच उभ्या होत्या. यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले.

यासंदर्भात न्यायालयीन प्रक्रियेमुळे विलंब होत होता. न्यायालयाने दिलेला आदेश मान्य राहिल, या निर्णयावर एस.टी. कर्मचारी ठाम असल्याने एस.टी.ची चाके डेपोतच रूतली होती. संपाचे नेतृत्त्व करणारे अ‍ॅड. गुणवंत सदावर्ते यांना अटक झाल्यामुळे एस.टी. कर्मचार्‍यांनी स्वतःच न्यायालयाने दिलेल्या मुदतीअखेर कामावर हजर होणे पंसत केले.

एस.टी. कर्मचार्‍यांना कामावर परतण्यासाठी न्यायालयाने 22 एप्रिल 2022 पर्यंत अखेरची मुदत दिली होती. या मुदतीत नांदगाव आगारातील 267 पैकी 233 कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत तर 32 कर्मचारी बडतर्फ करण्यात आले असून केवळ एक कर्मचारी हजर झाला नाही. मोठ्या संख्येने कर्मचारी कामावर रुजू झाल्याने ग्रामीण भागाची जीवनवाहिनी असलेली लालपरी रस्त्यावर धावतांना दिसू लागली आहे. यामुळे प्रवाशांना दिलासा लाभला आहे. नांदगाव रेल्वे स्थानकावरील रेल्वेगाड्यांचे थांबे मात्र अजूनही पुर्ववत करण्यात आले नसून लालपरी सुरू झाल्यामुळे प्रवाशांची गैरसोय टळली आहे.

Related Stories

No stories found.