समस्यामुक्त स्टेशनसाठी उपाययोजना करणार

समस्यामुक्त स्टेशनसाठी उपाययोजना करणार

भुसावळ डिव्हीजनचे प्रबंधक एस.एस. केडिया यांची ग्वाही

मनमाड | प्रतिनिधी Manmad

मनमाडसह (Manmad) भुसावळ (Bhusal) विभागातील सर्व स्थानकांवर असलेल्या समस्या सोडवून प्रवाशांना सर्व सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी रेल्वे प्रशासन (Railway Administration) कटिबद्ध आहे. सर्वच रेल्वे स्थानकावर (Railway station) मोठ्या प्रमाणात विकासकामे केली जात असून आगामी काळात स्टेशन समस्या मुक्त करण्यासाठी विविध उपयायोजना केल्या जात असल्याची माहिती भुसावळ डिव्हीजनचे प्रबंधक एस.एस. केडिया (Bhusawal Division Manager S.S. Kedia) यांनी येथे बोलतांना दिली.

भुसावळ डिव्हीजनचे (Bhusawal Division) प्रबंधक पदाची सुत्रे घेतल्यानंतर एस.एस. केडिया यांनी विभागात असलेल्या रेल्वे स्थानकांना भेटी देत पाहणी सुरू केली आहे. या अंतर्गत मनमाड जंक्शनला (Manmad Junction) त्यांनी भेट देवून पाहणी करत समस्या जाणून घेतल्या. यावेळी पत्रकारांशी वार्तालाप करतांना केडिया यांनी मनमाड स्टेशन समस्यामुक्त करण्याची ग्वाही दिली.

करोनामुळे (Corona) गेल्या दोन वर्षापासून मनमाड-कुर्ला गोदावरी एक्स्प्रेस (Manmad-Kurla Godavari Express) बंद असल्यामुळे या भागातील चाकरमाने सोबत सर्व सामान्य प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे शिवाय ग्रामीण भागातील जनतेसाठी वाहतुकीचे सर्वात स्वस्त साधन रेल्वे आहे. मात्र त्यांची हक्काची पॅसेंजर देखील बंद असल्यामुळे त्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो याकडे पत्रकारांनी केडिया यांचे लक्ष वेधले असता ट्रेन्स बंद ठेवल्यामुळे रेल्वेला मोठा तोटा सहन करावा लागत आहे. मात्र करोनामुळे रेल्वे प्रशासनाला निर्णय घ्यावा लागला.

सध्या करोना आटोक्यात येत असल्यामुळे हळूहळू गाड्या सुरु केल्या जात आहे. आगामी काळात गोदावरी एक्स्प्रेस (Godavari Express), पॅसेंजरसह इतर बंद असलेल्या गाड्या टप्याटप्प्या सुरु केल्या जातील असे आश्वासन त्यांनी दिले.

पावसाळ्यात रेल्वे स्थानकावरील सर्वच प्लॉट फार्मवरील छतातून मोठ्या प्रमाणात पाणी गळते त्यामुळे प्रवाशांना उभे राहण्यासाठी देखील जागा नसते त्यामुळे त्यांचे हाल होतात, यासह इतर समस्या देखील पत्रकारांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर डीआरएम केडिया यांनी त्याची दखल घेत संबधित अधिकार्‍यांना समस्या सोडविण्याच्या सूचना केल्या.

यावेळी त्यांनी रेल्वे स्थानकासह सर्व तिकीट बुकिंग कार्यालय, स्वच्छता गृह, प्रतीक्षालय, रेल्वे प्लॅटफार्म, रेल्वे सुरक्षा बल, रेल्वे पोलिस प्रशासन यांची पाहणी करून प्रवाशांच्या समस्या, गाड्यांची स्थिती, विविध विभागांचा आढावा घेतला. याप्रसंगी डीसीएम बी. अरुण कुमार, स्टेशन मास्टर यादव, सिटीआय एस.एन.राम, मुखसी एसआई.बिल.एल. मीणा, पीआरओ जीवन चौधरी यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com