लालपरीच्या ५०० फेर्‍यांंना प्रवाशांचा अल्पप्रतिसाद

लालपरीच्या ५०० फेर्‍यांंना प्रवाशांचा अल्पप्रतिसाद
राज्य परिवहन महामंडळ बसचे प्रातिनिधिक छायाचित्र

नाशिक | प्रतिनिधी

करोनाच्या महारीमुळे राज्य शासनाने राज्यातील बससेवा बंद करण्याचा निंर्णय घेतला होता, जिल्हयातील कोरोनाची दाहकता कमी झाल्यापने दि. 7 जूनपासून जिल्हयात 250 बसेस सुरु करण्यात आल्या आहेत, मात्रे प्रवाशाचा अल्पप्रतिसाद मिळ्त असल्याने एसटीला आथिक फट्का बसत असल्याचे चित्र आहे. नाशिक श्हर वगळ्ता जिल्हयातील प्रत्येक तालुक्यातून बसेस सुट्त असून दिवसभेरात एसटीच्या पाचशे फेर्‍या होत आहे. असे असतानाही एसटीला प्रतिसाद मिळ्त नसल्याचे चित्र आहे.

राज्य शासनाने कोरोनातील शिथीलता आणल्यानंतर एसटी प्रशसनाने जिल्हयात काही प्रमाणात बससेवा सु रु केली. परंतू दुपारी चार ते पहाटे पाच वाजेपर्यत संचारबंदी असल्याने याचा फट्का एसटी प्रशसनाला अधिक बसतो आहे.

नाशिक जिल्हयात 800 बसेस असून सध्याच्या घडीला अवघ्या 250 बसेस धावत आहे. ग्रामिण भागातून अगदी कमी प्रमाणात प्रवाशांचा प्रतिसाद मिळ्त असल्याने एसटीला आणखीनच आर्थिक झळ बसत आहे.

कोरोनामुळे मार्च ते ऑगस्ट 2020 दरम्यान बससेवा बंद होती, कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर ऑगस्ट 2020 ते फेब्रुवारी 2021 दरम्यान साडे सहाशे बसेस धावत होत्या, या द रम्यान प्रवाशाचा चांगला प्रतिसाद दिसून आला. कोरोनाची दूसरी लाट आल्याने पून्हा बस सेवा बंद करण्यात आली.

नाशिक जिल्हयातील कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्यावर बस सेवा पून्हा सु रु करण्यात आली आहे. आधीच आर्थिक चणचण असलेल्या या महामंड्ळाला चांगल्या महसुलाची अपेक्षा असताना प्रवाशांच्या अल्प प्रतिसादामुळे खो बसत आहे.

दरम्यान एसटीला मिळ्त असलेला अल्प प्रतिसाद पाहता येत्या काही दिवसात शसनाकडून पूण र्निर्बध काढल्यानंतरही पूर्ण क्षमतेने बससेवा सुरु होइल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. शाळ महाविद्यालयीन विदद्यार्थ्यासाठी जिल्हयात अडीचशे बसेसची व्यवस्था आहे, मात्र्र गेल्या वर्षभरापासून त्या बसेसही डेपोतच उभ्या वर्षापासून बंद असल्याने याचा अधिक एसटीला फटट्का बसत असल्याचे एसटी प्रशसनाने म्हट्ले आहे.

धार्मिक स्थळे बंद्चा फटका

द रम्यापन नाशिक जिल्हयासह राज्यातील धार्मिक स्थळे बंद असल्याने याचाही मोठा फटका एसटीला बसतो आहे. तर सलग दोन वर्षापासून पंढे रपूर, त्र्यंबकेश्वर येथील वारी बद असल्याने कोट्यावधीचा महसूल बड्त असल्याचे चित्र आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com