रेल्वे पोलिसांतर्फे प्रवासी जनजागृती सप्ताह

रेल्वे पोलिसांतर्फे प्रवासी जनजागृती सप्ताह

ना.रोड । प्रतिनिधी Nashikroad

नाशिकरोड रेल्वे पोलिस ठाण्यातर्फे Nashikroad Railway Police Station रेझींग डे निमित्त रेल्वे प्रवास , करोनाबाबत जनजागृती awarness of corona करून मास्क वाटपण्यात आले. रेल्वे प्रवासात सतर्कता बाळगावी असे आवाहन करण्यात आले.

करोनाबाबत जनजागृती व्हावी म्हणून रेल्वे बुकिंग ऑफिस, प्लॅटफॉर्म, रेल्वे गाड्या आणि स्थानक परिसरात पोस्टर्सव्दारे माहिती देण्यात आली. रेल्वे प्रवासा दरम्यान सतर्कता बाळगावी, स्कॅनर मशीनवर सामान तपासून घ्यावे, रेल्वे लाईन क्रॉस करू नये, मौल्यवान सामानाकडे लक्ष ठेवावे, संशयित व्यक्तीची माहिती पोलिसांना दयावी, चालु गाडी पकडू नये, रेल्वे गाडीच्या दारात उभे राहून मोबाईलवर बोलू नये, गाडीतून वाकून बाहेर पाहू नये, किंमती दागिने घालून गाडीच्या खिडकीत बसू नये, अनोळखी प्रवाशाकडून खाण्यापिण्याचे पदार्थ घेऊ नयेत, अनधिकृत विक्रेत्याकडून पदार्थ खरेदी करू नये, रात्री गाडीचे दरवाजे खिडक्या बंद करावेत.

प्रवासात आवश्यक असल्यास रेल्वे पोलिस, रेल्वे पोलिस दलाची मदत घेण्यासाठी हेल्प लाईन फोन नंबर 182 चा वापर करावा,उतरताना आपले सामान बरोबर असल्याची खात्री करून घ्यावी अशा सूचनांचे बॅनर स्थानक मुख्य प्रवेश व्दाराजवळ लावण्यात आले. प्रवासी, हमाल, मजूर, वेंडर, रिक्षाचालक आणि रेल्वे प्रशासनाचे कर्मचारी यांनी उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

यावेळी प्रभारी पोलिस अधिकारी बालाजी शेंडगे, उपनिरीक्षक भालेराव, रायटर विजय कपिले, अंमलदार संतोष उफाडे, भाऊ निकम, विलास इंगळे, शैलेश पाटील, उत्तम शिरसाठ, बाळू आव्हाड, संतोष आव्हाड, भगवान बोडके, जयश्री साळवे, आशा मोरे आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com