‘आक्रोश’ने दुमदुमले शहर; विविध संघटनांचा सहभाग

‘आक्रोश’ने दुमदुमले शहर; विविध संघटनांचा सहभाग

सिन्नर । प्रतिनिधी | Sinnar

तालुक्यातील सकल हिंदू समाजाच्या (hindu community) वतीने शहरातून काढण्यात आलेल्या आक्रोश मोर्चात विविध संघटनांनी उत्स्फूर्त भाग घेतला. मोर्चातील वंदे मातरम्, भारत माता की जय, जय श्रीरामसह विविध घोषणांनी शहरातील रस्ते दुमदुमून गेले होते.

मोर्चात विश्व हिंदू परिषद (Vishwa Hindu Parishad), बजरंग दल (Bajrang Dal), अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (Akhil Bharatiya Vidyarthi Parishad) यांच्यासह विविध पक्षांचे, संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. सिन्नर बसस्थानकापासून (Sinnar Bus Stand) मोर्चाची सुरुवात झाली.

सरस्वती पूल, गणेश पेठ, शिवाजी चौकमार्गे मोर्चा विविध घोषणा देत तहसील कार्यालयाच्या (Tehsil Office) प्रांगणात पोहोचला. यावेळी पदाधिकार्‍यांनी प्रांताधिकारी अर्चना पठारे (Province Officer Archana Pathare), तहसीलदार एकनाथ बांगडे (Tehsildar Eknath Bangde), पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे (Police Inspector Santosh Mutkule) यांना आपल्या विविध मागण्यांचे निवेदन (memorandum) दिले. यात हिंदू धर्माच्या प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या.

देशात लव्ह जिहादची (Love Jihad) हजारो प्रकरणे उघडकीस येत आहेत. हिंदू धर्मातील हजारो मुलींना जाणीवपूर्वक मुस्लीम तरुणांकडून प्रेमाच्या जाळ्यात अडकवले जात आहे. या मुलींचे शारीरिक शोषण करून त्यांच्या पोटी मुले जन्माला घालून त्यांच्याशी घटस्फोट घेण्याची हजारो उदाहरणे असल्याचे निवेदनात म्हटले आहे. यापैकी शेकडो मुलींच्या हत्यासुद्धा झाल्या आहेत. याबाबत देशातील मदरशांमधून, जामा मस्जिदसारख्या मुस्लीम केंद्रामधून मोठ्या प्रमाणात आर्थिक आमिषे दाखून मुस्लीम तरुणांकडून या देशामध्ये लव्ह जिहादसारखे प्रकार बक्षिसे देऊन घडून घेतले जात आहेत.

मदरशांची व मस्जिदीची आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. दिल्ली येथे श्रद्धा वालकर या भगिनीची संबंधित आरोपीने तिच्याशरी खोटे प्रेम करून, तिच्याशी शारीरिक संबंध ठेवून, त्यानंतर तिच्या शरीराचे तुकडे करून निर्घृणपणे खून केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. या गुन्हेगाराला लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी यावेळी मोर्चेकर्‍यांनी केली. त्याचबरोबर लव्ह जिहाद आणि धर्मांतरबंदी कायदा राज्यासह देशभरात लागू करावा

जोपर्यंत हे कायदे लागू होत नाहीत तोपर्यंत सातत्याने आंदोलने आणि मोर्चे काढण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. भाजपच जयंत आव्हाड यांनी दिल्लीत हिंदू तरुणीच्या शरीराचे 35 तुकडे करणार्‍या नराधामाला कठोरात कठोर शासन करण्याची मागणी करत अशा नराधमांच्या फसव्या प्रेमाला न फसण्याचे आवाहन केले. भाजपचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब शिंदे, प्रहारचे शरद शिंदे, कैलास दातीर यांच्यासह हजारो महिला-पुरुष यावेळी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com