
पिंपळगाव बसवंत । प्रतिनिधी | Pimpalgaon Baswant
निफाड तालुका (niphad taluka) एज्युकेशन सोसायटीच्या बी.पी. पाटील महाविद्यालयात डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम (Dr. A.P.J. Abdul Kalam) प्रज्ञाशोध परीक्षा घेण्यात आली. जिल्हाभरातून या परीक्षेत तब्बल पाच हजार विद्यार्थ्यांनी (students) सहभाग नोंदविला.
शंभर गुणांच्या या परीक्षेसाठी नववी व दहावी असे दोन स्वतंत्र गट करण्यात आले होते. पालकांसाठी सुद्धा लकी ड्रॉ (Lucky draw) ठेवण्यात आला होता. परीक्षेत नववी गटातील पहिले तीन गुणवंत विद्यार्थी तनुश्री भारत मोरे 97 गुण, बक्षीस 11 हजार रुपये, द्वितीय स्मित महेश निकम 94 गुण बक्षीस 9 हजार रुपये, तृतीय जान्हवी अजित शर्मा 81 गुण बक्षीस 5 हजार रुपये. दहावी गटात प्रथम क्रमांक ईश्वरी श्याम कातकाडे 89 गुण बक्षीस 12 हजार रुपये, द्वितीय शुभम सुधाकर मुंडे 86 गुण बक्षीस 10 हजार रुपये, तृतीय कृष्णा तुकाराम कापसे 84 गुण बक्षीस 6 हजार रुपये.
बक्षीस पात्र गुणवंत विद्यार्थ्यांना (students) मान्यवरांच्या हस्ते बक्षीस रकमेचे धनादेश, प्रशस्तीपत्रक व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी उपस्थित असलेले लाच लुचपत विभागाचे अधिकारी एन.एस. निहाळदे, ज्येष्ठ पत्रकार विश्वास देवकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब बनकर, उपाध्यक्ष भास्कर बनकर, पो.नि. प्रभाकर निकम, सेक्रेटरी अविनाश देशमाने, सहसेक्रेटरी अरुण महाले, संचालक रामराव मोरे, मंगला जाधव, उद्धव निरगुडे, लक्ष्मण खोडे, रामराव बनकर, समीर जाधव,
शिवाजी निरगुडे आदींसह महाविद्यालयाचे व्यवस्थापकीय संचालक दिनेश अनारसे, प्राचार्य प्रकाश भंडारे उपस्थित होते. प्रा.दिनेश अनारसे यांनी प्रास्ताविक केले. मीनाक्षी जाधव, दिपाली लोखंडे व प्रियंका शिंदे यांनी सूत्रसंचालन तर प्राचार्य प्रकाश भंडारे यांनी आभार मानले. परीक्षा यशस्वीतेसाठी योगेश्वर शिरसाठ, संदीप पाटील, चंद्रकांत नाईकवाडे, प्रशांत वाघ, विशाखा आहेर आदींनी परिश्रम घेतले.