नवमतदारांचा सहभाग महत्वाचा : थविल

नवमतदारांचा सहभाग महत्वाचा : थविल

नाशिक । प्रतिनिधी Nashik

भारतीय निवडणूक आयोगाकडून Election Commission of India देण्यात आलेल्या सर्वसमावेशक सुलभ आणि सहभागपूर्ण निवडणूका या जनजागृतीच्या संकल्पनेतून लोकशाहीत निवडणूक प्रक्रियेत जागृत नवमतदरांचा सहभाग अतिशय महत्वाचा आहे. असे प्रतिपादन उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्वाती थविल Election Officer Swati Thavil यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय मध्यवर्ती सभागृह येथे आयोजित 12 वा राष्ट्रीय मतदार दिवस दुरदृष्यप्रणालीद्वारे साजरा करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी उपजिल्हाधिकारी (प्रशासन) भिमराज दराडे, निलेश श्रींगी, तहसिलदार नितिन गावंडे यांच्यासह जिल्ह्यातील नवमतदार, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, निवडणूक साक्षरता मंडळे, मतदार नोंदणीसाठी सहकार्य करणार्‍या सामाजिक संस्था असे एकूण 95 मतदार ऑनलाईन उपस्थित होते.

यावेळी उपजिल्हाधिकारी स्वाती थविल म्हणाल्या, मतदार यादी पुर्नरिक्षण कार्यक्रमात जिल्हा निवडणूक कार्यालयामार्फत मागील वर्षभरात 3 लाख 76 हजार 170 अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी फॉर्म 6 ए मधील अर्ज 1 लाख 52 हजार 154 होते यांचा समावेश नवमतदार यादीत समावेश करण्यात आला आहे. नाव नोंदणी करतांनाच मतदार यादी शुद्धीकरण करण्यासाठी यात मयत, दुबार व स्थलांतरीत असे 1 लाख 6 हजार 446 मतदारांची वगळणी करण्यात आली आहे.

16 हजार दिव्यांग मतदारांची व 18 ते 19 वयोगटातील 32 हजार नवमतदारांची नावे यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. 35 हजार छायाचित्र नसलेल्या मतदारांचे छायाचित्र अपलोड करून आज जिल्ह्यातील मतदारांची यादी ही शंभर टक्के छायाचित्रांसह पूर्ण झाली आहे. हे काम करतांना सर्व मतदान नोंदणी अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी, निवडणूक नायब तहसिलदार, कर्मचारी, ऑपरेटर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचे योगदान खुप महत्वाचे असून हे काम मुदतीत पूर्ण करण्यात आले आहे.

राज्यात जिल्हास्तरीय रँकींगमध्ये नाशिक जिल्ह्याने आपले स्थान पाच क्रमांकाच्या आत कायम टिकवून ठेवले असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी स्वाती थविल यांनी यावेळी दिली. निवडणूकीचे काम करतांना मतदारांची जनजागृतीचीही आवश्यक होती यासाठी जिल्हा माहिती कार्यालय, नाशिक व पत्रकार यांचे सहकार्य मोलाचे आहे असेही, उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्वाती थविल यांनी यावेळी सांगितले.

लोकशाहीत नवमतदरांची भूमिका महत्वाची आहे व विकास व प्रगती साधण्यासाठी समाजातील सर्व घटकांचा सहभाग निवडणूक प्रक्रियेत महत्वाचा असल्याचे उपजिल्हाधिकारी भिमराज दराडे यांनी सांगून उपस्थितांना राष्ट्रीय मतदार दिवसाची प्रतिज्ञा व शुभेच्छा त्यांनी यावेळी दिल्या.

राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रमात दुरदृष्यप्रणालीद्वारे मुख्य निवडणूक आयुक्त सुशिल चंद्रा यांचा राष्ट्रीय मतदार दिवासाचा लघुसंदेश प्रसारित करण्यात आला. दुरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित नवमतदार इम्रान शेख, मतदार केंद्रस्तरीय अधिकारी कोठावदे, हर्षद सोनवणे, निवडणूक साक्षरता मंडळाचे प्रतिनिधी अर्जून पगारे, संस्कृती नागरे, बबलु मिर्झा, प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या आसावरी देशपांडे यांनी राष्ट्रीय मतदार दिवसाबाबत आपले मनोगत यावेळी व्यक्त केले. राष्ट्रीय मतदार दिनाचे उत्कष्ट कामकाज केलेले मतदार नोदंणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, मतदार केंद्रस्तरीय अधिकारी, डाटा एन्ट्री ऑपरेटर तसेच जिल्हा निवडणूक शाखेतील अधिकारी व कर्मचारी यांचा प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन नायब तहसिलदार राजेश अहिरे यांनी केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com