भारत जोडो यात्रेत नाशिक काँग्रेसचा सहभाग

भारत जोडो यात्रेत नाशिक काँग्रेसचा सहभाग

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

काँग्रेसनेते (Congress leader) खासदार राहुल गांधी (MP Rahul Gandhi) यांनी भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) सुरू केली असून महाराष्ट्रात (maharashtra) ती नुकतीच दाखल झाली असून यामध्ये नाशिक (nashik) मधील काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.

राज्यात दोन ठिकाणी त्यांच्या जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 18 नोव्हेंबर रोजी शेगाव (Shegaon) येथे दुपारी तीन वाजता होणाऱ्या जाहीर सभेसाठी नाशिक जिल्ह्यातून (nashik district) हजारो कार्यकर्ते जाणार आहेत. खा.राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते कश्मीर (Kanyakumari to Kashmir) अशी पदयात्रा सुरू केली आहे. सुमारे ३५०० हजार किमी ही यात्रा संपन्न होणार असून, मोठ्या संख्येने सर्व थरातील नागरिकांचा उस्फूर्त पाठींबा मिळत आहे.

महाराष्ट्रातील (maharashtra) सर्व पुरोगामी जनसंघटना, नागरीक, कार्यकर्ते यांच्या सिव्हिल सोसायटीने देखील सक्रिय सहभाग नोंदविण्याचा निर्णय घेतला आहे. भारत जोडो यात्रेत नाशिक शहर जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी सुरेश मारू व उद्धव पवार यांनी तिरंगा शर्ट परिधान करून हातात मशाली घेऊन भारत जोडो यात्रेचा संदेश देऊन नांदेड येथे भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी झाले आहेत.

तिरंगा शर्ट व भारत जोडो यात्रेसाठी (Bharat Jodo Yatra) तयार केलेले शर्ट संपूर्ण यात्रेमध्ये आकर्षण म्हणून पाहिले जात होते. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे (Maharashtra Pradesh Congress Party) नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (State President Nana Patole) व अन्य नेत्यांनी नाशिकच्या पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com