दांडीयात्रेत बागलाणकरांचा सहभाग

दांडीयात्रेत बागलाणकरांचा सहभाग

सटाणा । श्रीकांत रौंदळ | Satana

इंग्रजांच्या जुलमी गुलामगिरीतून देशाला स्वतंत्र (Independent) करण्यासाठी चंद्रशेखर आझाद (Chandrasekhar Azad), भगतसिंग (Bhagat Singh), सुकदेव (Sukhdev), राजगुरू (Rajguru) यासारख्या असंख्य क्रांतीकारकांनी प्राणाची आहुती दिली. तर देशभक्तीने (Patriotism) झपाटलेल्या असंख्य तरूणांनी बलिदान, योगदान दिले.

महात्मा गांधी (Mahatma Gandhi), लोकमान्य टिळक (Lokmanya Tilak), पंडित जवाहरलाल नेहरू (Pandit Jawaharlal Nehru), सुभाषचंद्र बोस (Subhash Chandra Bose), सरदार वल्लभभाई पटेल (Sardar Vallabhbhai Patel), डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) आदी असंख्य राष्ट्रपुरूषांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी इंग्रजांविरूध्द चळवळी उभारल्या.

त्यापैकी महात्मा गांधींनी (Mahatma Gandhi) दांडी यात्रा (Dandi Yatra) तथा मिठाचा सत्याग्रह ही प्रमुख चळवळ होती. या दांडी यात्रेत बागलाण तालुक्यातील (baglan taluka) स्वातंत्र्यसैनिकांचाही मोठा सहभाग राहिला.

तब्बल दिडशे वर्ष गुलामगिरीत असलेल्या भारतीय जनतेवर अन्याय-अत्याचार करणार्‍या इंग्रजांनी 1930 मध्ये मिठावर कर लागू केला होता. या अन्यायकारक कराच्या विरोधात महात्मा गांधींनी दांडीयात्रा काढून मिठाचा सत्याग्रह केला. अहमदाबादच्या (Ahmedabad) साबरमती आश्रमातून (Sabarmati Ashram) दि. 12 मार्च 1930 रोजी सुरू झालेल्या या दांडीयात्रेत गांधीजींसोबत निवडक 78 अनुयायी होते. त्यात सरोजिनी नायडू (Sarojini Naidu), ईला भट यांचा समावेश होता.

या यात्रेत मजल दरमजल जनसहभाग वाढत गेला. 240 मैल (390 कि.मी.) अंतर पार करीत दांडीयात्रा दि. 6 एप्रिल 1930 रोजी गुजरात राज्यातील दांडी येथे पोहचली. दांडीला नवसारी असेही संबोधले जात होते. 24 दिवसात दांडीयात्रा पुर्ण केल्यानंतर महात्मा गांधींनी मिठागारातून मुठभर मीठ उचलून इंग्रज सरकारने मिठावर लागू केलेल्या कराविरूध्द सविनय कायदेभंग केला. या सत्याग्रहामुळे इंग्रज सरकार हादरले. परिणामी मिठावरील कर रद्द करण्यात आला.

दांडीयात्रा नाशिक जिल्ह्याच्या (nashik district) कळवण (Kalwan), बागलाण (Baglan), सुरगाणा (Satana) तालुक्यातून जात असतांना या परिसरातील स्वातंत्र्यसैनिक व असंख्य लोक सहभागी झाले होते. त्यात प्रामुख्याने फुला शिवराम कापडणीस (टेंभे), भिकाजी कपाटे (मुंजवाड), एन.व्ही. अहिरे (आराई), बागलाणचे प्रथम आमदार सजन राघो पाटील, सावळीराम जगताप, वामनराव ठोके,

तुकाराम रामभाऊ ठोके (टेंभे), कळवण पंचायत समितीचे प्रथम सभापती त्र्यंबक शिवराम पाटील (पाळे) यांच्यासह असंख्य देशभक्तांचा समावेश होता. बागलाण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील साल्हेर, मुल्हेर, अलियाबाद परिसर गुजरात राज्याच्या डांग जिल्ह्यालगत आहे. महात्मा गांधींनी केलेल्या दांडीयात्रेनंतर स्वातंत्र्य लढ्याला वेग आला होता, हे विशेष.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com